24 Inch Smart TV Under 7000 Rs: तुम्ही एखादा कमी किंमतीचा बटेज स्मार्ट टीव्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केवळ 8 हजार रुपयांहून कमी किंमतीमध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्ही घेता येईल. भारतामध्ये हा टीव्ही नुकताच लॉन्च झाला आहे. यामध्ये अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत. हा टीव्ही 24 इंचाचा आहे. हा टीव्ही सध्या केवळ फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जात आहे.
जर्मनीमधील ऑडिओ ब्रॅण्ड असलेल्या ब्लाऊपंकटने (Blaupunkt) भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला असून त्यांचाच हा टीव्ही आहे. हा टीव्ही म्हणजे 3 इन 1 डिव्हाइस आहे असा कंपनीचा दावा आहे. याला मॉनिटर, स्मार्ट फिचर्स एक्सपीरिएन्स आणि टीव्ही म्हणून वापरता येईल असं कंपनीचं म्हणणं आहे.
ब्लाऊपंकटने (Blaupunkt) जारी केलेल्या एका पत्रकामध्ये या टीव्हीची किंमत 7499 रुपये असेल असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे एवढी कमी किंमत असूनही कंपनी यावर सूट देत आहे. त्यामुळे हा टीव्ही अगदी 7 हजारांहून कमी किंमतीत म्हणजेच 6999 रुपयांना ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. या टीव्हीचा सेल 7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीदरम्यान फ्लिपकार्टवर असणार आहे.
ब्लाऊपंकटने (Blaupunkt) या टीव्हीमध्ये अनेच फिचर्स देण्यात आले आहेत असं म्हटलं आहे. टीव्ही व्ह्यूईंग एक्सपिरियन्सचा वेगळा आनंद या टीव्हीच्या माध्यमातून मिळेला असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. 24 इंचाच्या या टीव्हीमध्ये एचडी रेडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 20 व्हॅट साऊंड आउटपूट देण्यात आला आहे. या टीव्हीच्या तळाशी फायरिंग स्पीकर्स देण्यात आले आहेत. इमर्सिव्ह ऑडिओ एक्सपीरियन्ससाठी सराऊंड साऊंड टेक्नोलॉजी वापरण्यात आली आहे.
स्लीक एअर स्लिम डिझाइन टीव्ही फारच सुंदर दिसतोय. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार A35x4 चिपसेट आणि 2.4 GHz WiFi स्पीडहून अधिक वेगवान आणि एफिशिएंट परफॉर्मन्स हा टीव्ही देईल. या टीव्हीचा ब्राइटनेस 300 निट्सपर्यंत आहे. टीव्हीचा डिस्प्ले क्रिस्प आणि क्लियर आहे.
ब्लाऊपंकटच्या (Blaupunkt) या टीव्हीमध्ये 512 एमबी रॅम देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 4GB ROM देण्यात आली आहे. हा टीव्ही फार वेगाने प्रतिसाद देतो. कंपनीने यामध्ये डिजिटल नॉइज फिल्टर आणि A+ Panel ची चांगली पिक्चर क्वालिटी दिली आहे.
टीव्हीमध्ये मल्टीपल डिव्हाइस सपोर्ट देण्यात आला आहे. यात कंप्युटर, मोबाइल फोन, लॅपटॉप कनेक्ट करता येतो. टीव्हीच्या रिमोटवरच Youtube, Prime Video, Zee5, Voot आणि Sony LIV साठी शॉटकट कीज देण्यात आल्या आहेत. किंमत आणि फिचर्सचा विचार करता हा सर्वोत्तम बजेट स्मार्ट टीव्ही आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.