मुंबई : जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर युझर्सना नवनवीन सुविधा मिळत असतात. मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर पैसे पाठवण्याचे फिचर्स आले होते. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपवर युझर्सना कॅब बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवासासाठी नेहमी खाजगी वाहनांवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. जाणून घेऊयात व्हॉट्सअॅपवर कशाप्रकारे सोप्प्या पद्धतीत कॅब बुक करता येणार.
उबर राइड्सची कॅब आता व्हॉट्सअॅपवर बुक करता येणार आहे. कॅब कंपनी उबर लवकरच व्हॉट्सअॅपसाठी हा नवीन पर्याय आणणार आहे. उबर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून दिल्ली-एनसीआरसाठी ही नवीन कॅब बुकिंग सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लखनऊ शहरात या फीचरची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे हि सेवा सुरु झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उबेरच्या मते, जे वापरकर्ते व्हॉट्सअॅपद्वारे कॅब बुक करतात त्यांना थेट उबर अॅपवर राइड बुक करण्याइतकीच सुरक्षा प्रदान केली जाईल. व्हॉट्सअॅपद्वारे कॅब बुक केल्यानंतरही, स्वत:चे नाव किंवा कॅब ड्रायव्हरचे नाव आणि लायसन्स प्लेट अशी माहिती वापरकर्त्यांना पाठवली जाईल. तसेच पिकअप पॉइंटची माहिती ठिकाणाच्या आधारे ड्रायव्हरला पाठवली जाईल. ड्रायव्हरशी बोलताना वापरकर्त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल. याचा अर्थ ड्रायव्हरला युजर्सचे व्हॉट्सअॅप नंबर पाहता येणार नाहीत.
अशी बुक करता येणार?