मुंबई : How to Become CBI Officer : CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तीन प्रकारे आवश्यक असणाऱ्या उमेदवारांची भरती करते. यासाठी खास परीक्षा घेतली जाते. (Cbi Officer Exam Latest News) विभागीय स्पर्धा परीक्षा घेतली जाते. एसएससी सीजीएल परीक्षा (SSC CGL) आणि यूपीएससी सिव्हिल ( UPSC) सेवा परीक्षा यांचा यात समावेश होतो. सीबीआय अधिकाऱ्याचे (CBI Officer) जॉब प्रोफाइल म्हणजे भारतातील हाय-प्रोफाइल प्रकरणांची चौकशी करणे, असा आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही भारतातील प्रमुख तपास यंत्रणा आहे. हे भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या 7 शाखा आहेत. प्रत्येक शाखा विशिष्ट प्रकारच्या तपासात माहीर असतात.
- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
- विशेष गुन्हे विभाग
- आर्थिक गुन्हे विभाग
- धोरण आणि इंटरपोल सहकार विभाग
- विभाग प्रशासन
- संचालनालय अभियोजन विभाग विभाग
भारताच्या सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग बनणे खूप कठीण आहे. या प्रतिष्ठित संस्थेसाठी निवड होण्यासाठी उमेदवार शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
20 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार SSC CGL भरती परीक्षेद्वारे केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये (CBI) उपनिरीक्षक (SI) पदासाठी अर्ज करु शकतात. CBIमधील सब-इन्स्पेक्टर (SI) साठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समतुल्य कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. त्यामुळे 20 ते 30 वयोगटातील पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतात. सीबीआयमधील सब इन्स्पेक्टरचा पगार 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये प्रति महिना असतो.
CBI अधिकारी (गट A) भरती UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोग आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि इतर संबंधित सेवांसह भारतातील नागरी सेवांमध्ये योग्य उमेदवारांची भरती करते. (CBI Officer Recruitment through UPSC Civil Services Exam (IPS) UPSC नागरी सेवा परीक्षेत तीन टप्पे आहेत, म्हणजे UPSC प्रिलिम्स, UPSC मुख्य आणि वैयक्तिक मुलाखत. UPSC मधून येणारे CBI अधिकारी (ग्रुप A) यांना दरमहा 56,100 रुपयांपर्यंत पगार मिळतो. तर उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 32 वर्षे आहे. मात्र, सरकारी नियमानुसार वयात सवलत दिली जाते.