मुंबई : दुकाटी मॉन्स्टर 821 बाइक भारतात लॉन्च करण्यात आली आहे, या बाईकची किंमत ९ लाख ५१ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक प्रतिलीटर १८ किमी मायलेज देणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही बाईक डिजिटल लॉन्च करण्यात आली, ही बाईक ट्वीटरवर लॉन्च करण्यात आली. यात एलईडी हेडलॅम्प देखील अपडेट करण्यात आले आहेत, यात फुल कलर टीएफटी इन्स्टुमेंट कन्सोल आहे, जो स्मार्टफोनसोबत पेयर केला जाऊ शकतो. आता दुकाटी आधीपेक्षाही जास्त क्लासिक दिसते.
The all New Monster 821, is now available in India. #821IndiaLaunch #Ducati #India #WeLoveMonster pic.twitter.com/EnBhlihTtG
— Ducati India (@Ducati_India) 1 May 2018
याआधी येणाऱ्या मॉन्सटरमध्ये 821 मॉडलवर तीन रायडिंग मोडस दिले होते. प्रत्येक मोडवर थ्रॉटल रेस्पॉन्स, एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोलसाठी वेगवेगळ्या सेटिंग्ज आहेत.
यात ब्रॅम्बो कॅलिपर्स आहे, यात पहिल्या चाकात 320एमएम डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकात 245एमएम डिस्क ब्रेक आहेत । ही बाईक रेग्युलर ब्लॅक, रेड आणि येलो शेडमध्ये उपलब्ध आहे. भारतात या बाईकची स्पर्धा Triumph Street Triple, Suzuki GSX-S750 आणि Kawasaki Z900 बाईकसोबत आहे.