मेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? धमकीमुळं एकच खळबळ

Facebook Threat : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या (Facebook) फेसबुकच्या पॅरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा मोठा निर्णय 

Updated: Dec 6, 2022, 08:16 AM IST
मेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? धमकीमुळं एकच खळबळ  title=
Facebook Threat US to Americas joe Biden Government latest Marathi news

Facebook Threat : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या (Facebook) फेसबुकच्या पॅरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंक आणि अमेरिकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद झाल्याचं लक्षात येत आहे. एक असा कायदा, जो अंलात आणण्यासाठी अमेरिका (America) पावलं उचलत असतानाच त्याला या मतभेदांचं कारण ठरत आहे. यात मतभेदांच्या पार्श्वभूमीवर मेटा प्लॅटफॉर्म्स इंकनं सांगितल्यानुसार जर, अमेरिकन (Congress) काँग्रेस जर्नलिज्म कॉम्पिटिशन एंड प्रीजर्वेशन एक्ट पास करते, तर मेटा त्यांच्या या प्लॅटफॉर्मवरून नाईलाजानं बातम्या पूर्णपणे हटवेल. कंपनीच्या मते या नव्या कायद्यामुळे ब्रॉडकास्टर्सना त्यांचा कंटेट पोस्ट करण्यातून फायदा होणार आहे. (Facebook Threat US to Americas joe Biden Government latest Marathi news )

(Meta) मेटा का करतंय विरोध? 

सदर कायद्यातून अधिनियम बातमीदार कंपन्यांसाठी मेटा आणि अल्फाबेट इंक यांसारख्या इंटरनेट दिग्गजांसोबत सामूहिक संवाद सोपा करेल याशिवाय काही अटीसुद्धा त्यांच्यासाठी फायद्याच्या असतील. मेटाचे प्रवक्ते एंडी स्टोन यांनी ट्विट करत या कायद्याविषयीचे काही विचारही मांडले. 

ऑस्ट्रेलियामध्ये न्यूज फीड बंद (Facebook news feed)

एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियामध्येही असाच कायदा मार्च 2021 मध्ये आला. ज्यानंतर मोठा टेक कंपन्यांसोबतचा संवाद अधिक सोपा झाला. ज्यानंतर मेटानं या देशात त्यांचं न्यूज फीड बंद केलं. या अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार ज्या क्षणापासून न्यूज मीडिया बार्गेनिंग कोड प्रभावी झाला आहे. मेटा आणि अल्फाबेटसह विविध कंपन्यांनी माध्यम संस्थांशी 30 हून अधिक करार केले, ज्यामध्ये त्यांना क्लिक आणि जाहिरातींच्या माध्यमातून नफा होत होता. ऑस्ट्रेलियात मेटाची भूमिका, अमेरिकेचा धमकीवजा इशारा पाहता भारतासह इतरही राष्ट्रांमध्ये मेटा अशा भूमिका घ्यायला मागेपुढे पाहणार नाही, हीच शक्यता आता अधिक गडद होताना दिसत आहे. 

हेसुद्धा वाचा : Laptop ची काळजी घेत Keyboard अशा पद्धतीने स्वच्छ कराल, जाणून घ्या सोपी पद्धत

आव्हानं कमी नाहीत... 

साधारण वर्षभरापूर्वीपासून आढावा घेतला तर, मेटा अधोगतीस गेल्याचं पाहायला मिळत आहे. मेटाचा तोटा वाढतच चालला आहे. यंदाच्या वर्षात जुलै ते सप्टेंबर या त्रैमासिक काळात मेटाच्या नफ्यातही मोठी घट झाली आहे. जे प्रमाण आता कमी होऊन 4.4 अरब डॉलर्सवर आलं आहे. मागील वर्षाच्या त्रैमासिक काळात हाच आकडा 9.2 अरब डॉलर इतका होता. कंपनीच्या रॉयल्टीमध्येही 4 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी जी रॉयल्टी 29.01 अरब डॉलर्स इतकी होती तीच आता 27.71 डॉलर्सवर पोहोचली आहे. त्यामुळं सातत्यानं होणारा हा तोटा पाहता आता मेटा अधिक सावधगिरीनं पावलं टाकत असल्याचं स्पष्ट होत आहे.