Google Search Update: गुगलची लोकप्रिय ईमेल सर्व्हिस जीमेलचा वापर जगभरात सर्वाधिक केला जातो. ऑफिसच्या कामापासून ते महत्त्वाची कागदपत्रं पाठवण्यासाठी एक अधिकृत पद्धत म्हणून जीमेलचा वापर केला जातो. ऑफिसमधील प्रत्येक कामासाठी खासकरून गुगलच्या याच ईमेल सर्व्हिसचा वापर केला जातो. स्मार्टफोनमध्ये देखील तुम्हाला जीमेलनेच लॉगइन करावे लागते. (gmail new feature update)
आपण जीमेलचा वापर तर करतो, मात्र यातील काही मोजकेच फीचर्स आपल्याला माहित असतात. जीमेलने एक्सापायरी मोडपासून ते पासकोडपर्यंत अनेक नवीन फीचर्स आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडले आहे. अशाच काही जीमेलच्या फीचर्सविषयी जाणून घेऊया, ज्याची माहिती खूप कमी लोकांना आहे.
गुगलने (google) जीमेल (gmail) आणि गुगल चॅट्ससाठी (google chats) तीन नवीन वैशिष्ट्यांची घोषणा केली आहे. या फीचर्सच्या मदतीने यूजर्सना वेब आणि मोबाईलवर चांगला सर्च अनुभव मिळेल. कंपनीच्या मते, या फीचर्सच्या मदतीने यूजर्सना अधिक अचूक आणि कस्टमाइज्ड सर्च सिलेक्शन (Customized search selection) आणि रिझल्ट मिळतील. नवीन वैशिष्ट्यांच्या सूचीमध्ये शोध सूचना, Gmail लेबल आणि संबंधित परिणामांचा समावेश आहे.
सध्या, ही वैशिष्ट्ये सर्व वापरकर्त्यांसाठी जारी केलेली नाहीत. हे फक्त काही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि येत्या काही दिवसांत त्यांचा विस्तार केला जाईल. चला जाणून घेऊया गुगलच्या नवीन फीचर्सची (Google’s new features) माहिती.
वाचा : दिवाळीत शेअर्स खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
गुगलने तीन नवीन फिचर्स जारी केले : तिन्ही नवीन Google वैशिष्ट्ये सर्व Google Workplace ग्राहक, G Suite Basic आणि Business वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. Google चॅट शोध सूचना वैशिष्ट्य आधीपासूनच Android डिव्हाइसवर उपलब्ध आहे आणि ऑक्टोबरच्या अखेरीस iOS वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.
वापरकर्त्यांना शोध सूचना मिळेल : दुसरीकडे, जर आपण नवीन जीमेल आणि चॅट फीचरबद्दल बोललो तर ते वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. चॅटची शोध सूचना वैशिष्ट्ये वापरकर्त्यांच्या मागील शोध इतिहासावर आधारित शोध क्वेरी सुचवतील. म्हणजेच, तुम्ही एखादी गोष्ट टाइप करताच, तुम्हाला चॅट सर्च बारमध्ये त्याच्याशी संबंधित सूचना मिळू लागतील. याच्या मदतीने युजर्स महत्त्वाचे मेसेज, फाइल्स पुन्हा पाहू शकतात.
वाचा : तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा!
लेबल्सच्या मदतीने तुम्ही मेल सहज शोधू शकाल : Gmail लेबल वैशिष्ट्य Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर वेब यूजर्ससाठीही उपलब्ध होऊ शकते. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते विशिष्ट Gmail लेबलखाली मेसेज शोधू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्हाला एकाच ठिकाणी समान लेबल असलेले संदेश मिळतील. तुम्ही एका क्लिकवर हे संदेश सहज अॅक्सेस करू शकता.
संबंधित निकालाचा लाभ मिळेल : तुम्ही ते वेबवर वापरण्यास सक्षम असाल. हे नंतर मोबाईल अॅपवर (mobile app) जोडले जातील. हे वैशिष्ट्य Gmail शोध क्वेरीसाठी आहे. तुम्ही Gmail वर काहीतरी शोधताच, ते संबंधित परिणाम देखील दर्शवेल.