मुंबई : आज संपूर्ण जग डिजीटल झालं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आज स्मार्टफोनचा वापर होत आहे. स्मार्टफोन हा आता माणसाच्या जीवनातील सर्वात महत्वाचा घटक बनला आहे. हल्ली स्मार्टफोनवर सोशल मीडिया पासून ऑनलाईन मिटींग, व्हिडिओ कॉन्फरन्स, ग्राफिक्स, सॉफ्टवेअर, चित्रपट या सर्व गोष्टीचा वापर करतो यासह विविध प्रकारची जगातील माहिती घेत असतो. इतकंच काय तर अनेक म्हत्वाची कागदपत्रं आपण स्मार्टफोनमध्ये सेव करुन ठेवतो. पण जर तुमचा फोन हरवला किंवा बंद झाला तर आपण अस्वस्थ होतो. फोन हारवलेल्या व्यक्तीला सर्वात जास्त चिंता त्याच्या मोबाईल डेटाची असते.
हल्ली सर्व काही डिजीटल करण्याची पद्धत आहे. त्यामुळे बहूदा आपण आपल्या वैयक्तिक जीवनातील फोटोज स्मार्टफोन मध्ये सेव करतो. अशा परिस्थितीत एखाद्याचा स्मार्टफोन हरवला तर त्या व्यक्तीला सर्वात जास्त चिंता त्याच्या मोबाईल डेटाची असते. त्यात अनेक म्हत्वाचे मोबाईल नंबर सह वैयक्तिक जीवनातील फोटो व्हायरल होण्याची भिती असते. अशा परिस्थितीत आम्ही आपल्याला डेटा सुरक्षिततेशी संबंधित काही खास टिप्स सांगणार आहोत जे आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतील.
डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी Google ची मदत
आपला डेटा सुरक्षित रहावा म्हणून आपण गूगलची मदत घेऊ शकता. कारण Google केवळ आपल्या Android स्मार्टफोनसाठी ऑपरेटिंग सिस्टमच देत नाही, तर आपल्या संपूर्ण मोबाईची जबाबदारी घेत असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत Google आपल्याला अशा सुविधा पुरवतो ज्यात थोडी सावधगिरी बाळगत आपण गुगलच्या सहाय्याने केवळ आपला डेटाच नव्हे तर थोडा प्रयत्न करुन हरवलेला फोन देखील शोधू शकता. त्यासाठी आपल्याला काही स्टेप्सला फॉलो करावे लागेल.
कशी घ्याल गुगलची मदत?
सर्व प्रथम आपल्याला android.com/find या साईटवर जावे लागेल. आणि आपले अकाऊंट लॉगइन करावे लागेल. हे तेच Google खाते असले पाहिजे, जे तुमच्या फोनवर आधीपासून लॉगइन झालेले असेल. गूगल खात्यात लॉगइन केल्यानंतर, आपण आपल्या फोनच्या डाव्या कोपऱ्याच्या वरच्या बाजूस गेल्यावर तेथे अनेक फोनची नोंदणी दिसेल त्यात आपला हारवलेला फोन सेलेक्ट केल्यानंतर हारवलेल्या फोनची बॅटरी, शेवटची वेळ, तारीख आणि लोकेशन आपल्याला दाखवेल.
हरवलेल्या फोनचे शेवटचे लोकेशन
आपल्या हरवलेल्या फोनचे शेवटचे लोकेशन गुगल आपल्याला दाखवेल. जर आपला फोन आपल्या घरीच हरवला असेल तर गुगल लोकेशनच्या मदतीने आपण त्या जागी पोहचू शकता. त्यासह आपण 5 मिनिटांसाठी सतत रिंग देखील करू शकता, फोन सायलेंट मोडमध्ये असला तरीही, फोन 5 मिनिटांपर्यंत वाजत राहील. अशा परिस्थितीत आपणास फोन मिळू शकतो.
हरवलेल्या फोनचा डेटा डिलीट करणे
जर आपला फोन खूप शोधून सापडत नसेल तर गुगलच्या शेवटच्या तीस-या म्हणजेच इरेज डिव्हाइसचा पर्याय क्लिक करुन, सर्व डेटा आपल्या फोनवरून डिलीट होईल. त्यानंतर आपल्या गमावलेल्या फोनमध्ये फाइन्ड माय डिव्हाइसचे कार्य देखील थांबेल. आपला फोन ऑनलाईन नसेल तर फोन इंटरनेटशी कनेक्ट होताच. त्याचा डेटा आपोआप हटविला जाईल. यामुळे, फोन कोणाकडेही असला तरीही, आपला डेटा पूर्णपणे सुरक्षित आणि केवळ आपल्याकडेच राहिल.
ही महत्त्वाची सेटींग करणे आवश्यक
अशा परिस्थितीत गुगलची ही सेवा आपल्या हरवलेल्या स्मार्टफोन मध्ये तेव्हाच काम करु शकेल. जेव्हा मोबाईलमध्ये आपले ईमेल लॉगइन असेल, मोबाईल डेटा किंवा वाय-फायच्या मदतीने फोन इंटरनेटशी कनेक्ट असने आवश्यक आहे. इतकेच नाही तर फोनची लोकेशन सेटिंगही चालू असली पाहिजे, त्यासोबतच फाइंड माय डिव्हाइसचा पर्यायही फोनमध्ये चालू असणे आवश्यक आहे. जर आपण हे सर्व चालू ठेवले असेल तर आपला डेटा केवळ सुरक्षितच राहणार नाही तर त्यावर संपूर्ण नियंत्रण देखील आपलेच राहील.