जबसदस्त कॅमेरा आणि फीचर्स, फोटो आणि बॅटरीसाठी बेस्ट 5G स्मार्टफोन

आला रे आला! 108 MP कॅमेरा आणि दमदार बॅटरी; जबरदस्त स्मार्टफोनचे जाणून घ्या फीचर्स  

Updated: Jul 9, 2022, 10:39 AM IST
जबसदस्त कॅमेरा आणि फीचर्स, फोटो आणि बॅटरीसाठी बेस्ट 5G स्मार्टफोन title=

मुंबई : Infinix ने मार्केटमध्ये धमाकेदार फोन आणला आहे. Infinix ने नोट 12 G फोन लाँच केला आहे. Note 12 5G Pro देखील यामध्ये आणला आहे. फोन 6.7 इंच फुल-एचडी + AMOLED डिस्प्ले सोबत 180Hz टच सँपलिंग रेट  108-मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेऱ्याचं सेटअप देण्यात आला आहे. Infinix Note 12 5G Pro ची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया. 

Infinix Note 12 5G Pro Price
 Infinix Note 12 5G Pro हा फोन 8GB + 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे. याची किंमत 17,999 रुपये आहे. 14 जुलैपासून ऑनलाईन हा फोन उपलब्ध होणार आहे. याची किंमत ऑफलाईन वाढण्याची देखील शक्यता आहे. 

Infinix Note 12 5G Pro Specifications
या फोनला 8 GB रॅम आणि 128 GB स्टोअरेज देण्यात आलं आहे. ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंशन 810 चिपसेट आहे. तीन कॅमेरे मिळणार आहेत. यामध्ये 108MP प्रायमरी, 2MP चा डेप्थ सेंसर आणि 2 MP चा मायक्रो सेंसर कॅमेरा आहे. तर 16 MP सेल्फी कॅमेरा असणार आहे. 

या फोनमध्ये युजर्सना 5,000mAh बॅटरी मिळणार आहे. तर 33 व्हॅटचा चार्जर असेल. जो केवळ अर्ध्या तासात फोन चार्ज करेल. या फोनला साइड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.