SUV ची ही गाडी होणार लवकरच लॉन्च? लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात..

सॉनेट कंपनीची ही एक आकर्षक गाडी आहे.

Updated: Aug 20, 2022, 11:02 PM IST
SUV ची ही गाडी होणार लवकरच लॉन्च? लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात.. title=

Kia SUV Coming Soon: Kia India ने Kia Sonnet SUV या नव्या कारची पहिली झलक प्रसिद्ध केली आहे. सॉनेट कंपनीची ही एक आकर्षक गाडी आहे.

या गाडीमध्ये अशी वैशिष्ट्ये आहेत जी सोनेटच्या इतर गाण्यांमध्ये नव्हती. आता कंपनी Kia Sonet SUV चा आणखी एक अवतार बाजारात येणार आहे. कंपनी सॉनेटचे हे X Line Varient आहे. ही गाडी अत्यंत स्पोर्टी आणि आकर्षक आहे. Seltos SUV चे X Line Varient देखील अशीच होती. 

Kia Sonet X Line मध्ये काय खास असेल? 
Kia Sonet चा X Line Varient कारचा हा प्रकार GTX Plus Varient वर आधारित आहे. या गाडीच्या बाह्यरूपात थोडा बदल पाहायला मिळेल. या गाडीचा रंग मॅट कलरमध्ये आहे. 

गाडीच्या ORVM वर चकचकीत काळा रंग दिसेल. फॉक्स स्किड प्लेट्सवर पियानो ब्लॅक फिनिश आणि क्रोमच्या जागी क्लासी काळा रंग असेल. याशिवाय थोडा लाल रंगही तुम्हाला यात मिक्स झालेला दिसेल. 

गाडीचा लुक फार स्पॉर्टी येण्यासाठी यात लेदरेट सीट्स आहेत. इंजिन आणि ट्रान्समिशनच्या मध्ये 7-स्पीड DCT सह 1.0L टर्बो पेट्रोल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरसह 1.5L डिझेल असेल.