मुंबई: रॉयल एनफील्डच्या नव्या Classic 500 Pegasus Edition बाईकचे बुकींग आजपासून सुरू करण्यात आले आहे. दिल्लीतील एका शोरूमने दिलेल्या माहितीनुसार या नव्या कोऱ्या मॉडेलची किंमत २.४० लाख रूपये इतकी सांगितली जात आहे. अत्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध असलेल्या या मॉडेलचे बुकींग तुम्ही ऑनलाईनही करू शकता. प्राप्त माहितीनुसार भारतात या मॉडेलची केवळ २५० युनिट्सच विकली जाणार आहेत. तर, जगभरात या मॉडेल्सची केवळ १,००० युनिट्स विकली जातील.
Royal Enfield Classic 500 Pegasus Edition बाईक रॉयल एनफील्ड RE/WD 125 वर आधारलेली आहे. या बाईकला फ्लाईंग फ्ली (Flying Flea) नावानेही ओळखले जाते. Flying Flea ला ब्रिटीश पॅराट्रूपर्स वर्ल्ड वॉर २च्या दरम्यान वापरले जात असे. या बाईकच्या ऑनलाईन बुकींग नंतर एक यूनीक कोड जनरेट होईल आणि त्याच्या माध्यमातूनच लॉगइन करून आपण ही बाईक खरेदी करू शकाल.
भारतात आलेली सर्विस ब्राऊन पेंट स्कीमवाली या बाईकच्या फ्यूल टॅंकवर २५०व्ही एयरबोर्न लाईट कंपनीच्या स्मरणार्थ एक सीरियल नंबर लावण्यात आला आहे. सांगितले जाते की, या कंपनीने दुसऱ्या महायुद्धात आपली सेवा दिली होती. फ्यूल टँकवकर निळा पेगासस लोगोही देण्यात आला आहे. जो पॅराशूट रेजिमेंट ऑफिशिअली लोगो आहे.
रॉयल एनफील्डने या बाईकमध्ये अनेक अक्सेसरीजही दिली आहेत. यात ब्राऊन कलरच्या हँडलबार ग्रिप्स, एअर फिल्टरच्या जवळ ब्रासचे बक्कल आणि एक लेदर स्ट्रॅप, हेडलाईट बेजल, पॅडल, किसस्टार्ट लिवर आणि रिम्स या गोष्टी प्रमुख आहेत.
पॉवरसाठी Classic 500 Pegasus Editionमध्ये रॉयल एनफील्डने ४९९सीसी, सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड इंजिन लावले आहे. हे इंजिन २७.२ बीएचीपीचे पॉवर आणि ४१.३ न्यूटन मीटर मॅक्सिमम टॉर्क जनरेट करतो. इंजिनला ५ स्पीड ट्रान्समिशनयुक्त बनविण्यात आले आहे.