नवी दिल्ली : जर तुम्ही शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही घेतला नसेल तर तुमच्याकडे अजून एक संधी आहे. कंपनीने टीव्हीची ऑनलाईन विक्री शुक्रवारी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू केली आहे.
ई कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट (www.flipkart.com) आणि शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवर स्मार्टटीव्हीचा सेल सुरू झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच शआओमीने स्वस्त दरात टीव्ही बाजारात आणलाय.
शाओमीने एमआयटीव्ही 4A स्मार्ट TV ला 32 इंच आणि 43 इंचमध्ये असे दोन वेरिएंट लाँच केले आहेत. 32 इंच असलेला टीव्ही 13,999 रुपये आणि 43 इंच टीव्ही 22,999 रुपयांत मिळणार आहे.
या दोन्ही मॉडेलला कंपनीने भारतीय बाजारात आणलं आहे. या अगोदर कंपनीने 55 इंचाचा एमआय टीव्ही 4 लाँच केला आहे.
32 इंच आणि 43 इंचाचा एमआय टीव्ही 4A मध्ये AI बेस्ड पॅचवॉल UI दिला आहे. Mi.com च्या संकेत स्थळावर 43 इंचाच्या टीव्हीची किंमत 24,999 रुपये आणि 32 इंचाची टीव्हीची किंमत 14,999 रुपये आहे.
या दोन्ही टीव्हीमध्ये 5 लाख कंटेट देण्यात आला आहे. ज्यामध्ये 80 टक्के फ्री कंटेट आहे. हॉट स्टार, वूट, वूट किड्स, सोनी लिव, हंगामा प्ले, जी5, सन नेक्सट, एएलटी बालाजी, व्यू, टीवीएफ आणि फ्लिक्स ट्री कंपनीचे कंटेंट पार्टनर आहे.
३२ इंच आणि ४३ इंचाच्या एमआय टीव्ही 4 A आणि AI पॅचवॉल UI दिला गेलाय. Mi.com वर 43 इंचच्या टीव्हीची किंमत 24,999 दाखवेल.
तर 32 इंचच्या टीव्हीची किंमत 4,999 रुपये आहे. लॉन्च ऑफरनुसार तुम्हाला जियोफाय ४ जी हॉटस्पॉट डिव्हाइससोबत 2,200 रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळणार आहे.