नवी दिल्ली : मोटो ई ४ प्लस हा स्मार्टफोन बुधवारी भारतात लाँच झाला. हा स्मार्टफोन लाँच झाला आणि अवघ्या २४ तासांत तब्बल १ लाख स्मार्टफोनची विक्री झाली.
फ्लिपकार्ट या ई कॉमर्स साईटवरुन या फोनची विक्री सुरु आहे. एका दिवसांत इतक्या स्मार्टफोनची विक्री पाहता एका तासाला तब्बल ५८० स्मार्टफोन विकले गेलेत.
मोटो ई ४ प्लस लाँच लाईव्ह गेल्यानंतर तब्बल १.५ लाख ग्राहकांनी या पेजला भेट दिली.
फीचर्स -
अँड्रॉईड ७.१.१ नॉगट
५.५ इंचाचा डिस्प्ले
३ जीबी रॅम
१.३ गिगाहर्टझ क्वाड कोर
३२ जीबी रॅम, १२८ जीबी एक्सपांडेबल मेमरी
४ जी, वायफाय
१३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
किंमत - ९,९९९ रुपये