मुंबई : व्हॉट्सअॅपनं त्यांचं नवं फिचर लॉन्च केलं आहे. व्हॉट्सअॅपच्या ग्रुपसाठीचं हे फिचर मेंबरना फायदेशीर ठरणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमुळे आता ग्रुप डिस्क्रिप्शन देता येणार आहे. यामुळे या ग्रुपचा उद्देश काय तसंच हा ग्रुप कशासाठी बनवण्यात आला होता, याची माहिती ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये देता येणार आहे. ग्रुप डिस्क्रिप्शन ५१२ शब्दांपर्यंतच असेल. ग्रुप फोटो आणि ग्रुपच्या नावाखाली हे डिस्क्रिप्शन वाचता येईल.
ग्रुप डिस्क्रिप्शनबरोबरच व्हॉट्सअॅपनं आणखी एक नवं फिचर दिलं आहे. ग्रुपमधल्या व्यक्तीला आता सर्च करण्यासाठी स्क्रोल करायची गरज नाही. व्हॉट्सअॅपनं ग्रुपमध्येच सर्च हा ऑप्शन दिला आहे. तसंच नव्या अपडेटमध्ये व्हॉईस कॉलवरून व्हिडिओ कॉलवर स्विच करणं आणखी सोपं करण्यात आलंय.