नवी दिल्ली : ऑनलाईन मेसेजिंग ऍप म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपचा वाापर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात होत आहे. नेहमीच वापरात येत असलेल्या व्हॉट्सऍपमध्ये एका नव्या फिचरची भर पडणार आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्हाला वेग-वेगळ्या चॅटसाठी वेग-वेगळे बॅकग्राऊंड ठेवता येणार आहेत. रिपोर्टनुसार सध्या या नव्या फिचरची टेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना ऍन्ड्रॉईड बीटा व्हर्जन वापरण्याची परवानगी आहे, त्यांना देखील हे नवे फिचर वापरता येत नाही.
जेव्हा हे फिचर पूर्णपणे तयार होईल तेव्हा ऍन्ड्रॉईड बीटा व्हर्जन वापरणाऱ्या व्यक्तींसाठी हे फिचर उपलब्ध हेणार आहे. त्यानंतर जे व्हॉट्सऍप युजर आहेत त्यांना हे फिचर वापरता येणार आहे. बीटा व्हर्जन v2.20.199.5 वर हे नवीन फिचर जोडण्यात आलं.
व्हॉट्सऍप आपल्या बीटा व्हर्जन अंतर्गत नव्या फिचरवर काम करत आहे. ज्यामध्ये ग्रुप कॉलसाठी रिंगटोन, कॉन्टॅक्ट शॉर्टकट, स्टिकर एनिमशन यांसारख्या नव्या फिचरचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात व्हॉट्सऍप आणखी अपडेट होणार असल्याचं दिसून येत आहे.
रिपोर्टनुसार, या सर्व आगामी फिचरवर सध्या व्हॉट्सऍप टीम काम करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कंपनी आपले नवीन फिचर लाँच करण्याची शक्यता आहे.