Charger शिवाय फोन विकणं iPhone ला असं पडलं महागात...

Apple कंपनीने iPhone सोबत सुरुवातीला चार्जर देत होती. परंतु नंतर 2020 मध्ये कंपनीने चार्जर देणं बंद केलं.

Updated: Apr 22, 2022, 08:26 PM IST
Charger शिवाय फोन विकणं iPhone ला असं पडलं महागात... title=

मुंबई : नवीन फोन घ्यायचा म्हटलं की बरेच लोक सर्वात पहिलं नाव घेतात ते म्हणजे Apple किंवा iPhone. या फोनमध्ये चांगल्या कॅमेरासह अनेक चांगले फीचर्स येतात. जे ग्राहकांना त्यांच्याकडे खेचतात. याशिवाय हा फोन लोकं आपलं राहानिमान दाखवण्यासाठी देखील विकत घेतात. त्यात एकदा का तुम्हाला iPhone वापरण्याची सवय लागली, तर तुम्हाला दुसरा कोणताही फोन चांगला वाटणार नाही किंवा तो वापरण्याची इच्छा देखील होणार नाही. 

Apple कंपनीने iPhone सोबत सुरुवातीला चार्जर देत होती. परंतु नंतर 2020 मध्ये कंपनीने चार्जर देणं बंद केलं. विनाचार्जर फोन विकल्यामुळे इलेकट्रोनिक्स कचरा कमी होतो असं कंपनीने कारण देत, चार्जर शिवाय फोन विकायला सरुवात केली.

ज्यानंतर कंपनीने iPhone 12 आणि iPhone 13 सीरिजचे फोन्स विना चार्जर बाजारात आले आहेत. परंतु बऱ्याच ग्राहकांना या फोन वापरण्याची सवय लागली असल्या कारणाने त्यांनी ते विना चार्जन फोन घेण्यासाठीही सुरुवात केली.

परंतु ही बाब ब्राझीलच्या ग्राहक कायद्यात बसत नाही, म्हणून तेथीन कोर्टानं चार्जरविना आयफोन विकण्यासाठी ग्राहकाला 1000 डॉलर्स (जवळपास 76,000 रुपये) नुकसान भरपाई देण्यास सांगितली आहे. 

या कारणामुळे कंपनीकडून दिला जात नाही चार्जर

सुरुवातीला अ‍ॅप्पलने फोनसोबत चार्च न देताच फोन विकण्यासाठी सुरुवात केली होती. मात्र आता अ‍ॅप्पल पाठोपाठ सॅमसंग, शाओमी आणि रियलमीनं देखील चार्जर विकणं सुरु केलं आहे. या कंपनी चार्जर न देण्यामागे पर्यावरणाचं कारण सांगतात. परंतु असं केल्यामुळे कंपन्या जास्तच फायद्यामध्ये येऊ लागल्या आहेत.

ही कारण कोणती?

- बॉक्समध्ये चार्जर नसल्यामुळे त्याचा आकार कमी होतो, तसेच कमी जागेत जास्त स्मार्टफोन्स बसतात, ज्यामुळे शिपिंगचा खर्च ही वाचतो.

- तसेच यामुळे मोबाईलची किंमत थोडी कमी होते, त्यामुळे ग्राहक तो फोन घेण्याचा विचार करतात. तसेच वेगळा चार्जर विकून होणारी कमाई देखील या फायद्यात जोडता येईल. 

परंतु असं करणं म्हणजे कंज्यूमर लॉचं उल्लंघन करत आहे, असं ब्राजीलच्या कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने ग्राहकाला 1000 डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.

याआधी देखील ब्राझीलमध्ये ग्राहक कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे कंपनीला 2 मिलियन डॉलर (जवळपास 15.2 कोटी) चा दंड ठोठावण्यात आला होता.

ज्यामुळे कदाचित आता ब्राझीलमध्ये कंपनी आयफोन चार्जरसह फोन विकू शकते.

परंतु कंपनी भारतात चार्जरसह फोन विकेल की नाही हे अद्याप समोर आलेलं नाहीय, या प्रकणानंतर आता कंपनी काय भूमिका घेतेय, याकडेच सर्वांच लक्ष आहे. तसेच अशी कारवाई सॅमसंग, शाओमी आणि रियलमी कंपनीवर देखील होईल का, हे देखी पाहावं लागणार आहे.