Netflix : नेटफ्लिक्स यूझर्ससाठी वाईट बातमी, पासवर्ड शेअर....

नेटफ्लिक्स (Netflix) लवकरच एक फीचर लाँच करणार आहे. यामुळे पासवर्ड शेअरिंग एक पेड फीचर होईल.

Updated: Oct 19, 2022, 04:08 PM IST
Netflix : नेटफ्लिक्स यूझर्ससाठी वाईट बातमी, पासवर्ड शेअर.... title=

मुंबई : नेटफ्लिक्स (Netflix) जगातील लोकप्रिय ओटीटी (Ott) प्लॅटफॉर्मपैकी एक. नेटफ्लिक्सने आतापर्यंत अनेक बदल केले आहेत. यूझर्सना या बदलाचे काही फायदे झालेत तर काही तोटेही झालेत. जर तुम्ही मित्राकडून नेटफ्लिक्सचा लॉगीन पासवर्ड घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. (ott netflix launch new profile transfer feature soon will users pay extra and share password)

नेटफ्लिक्स लवकरच एक फीचर लाँच करणार आहे. यामुळे पासवर्ड शेअरिंग एक पेड फीचर होईल. थोडक्यात काय तर जर लॉगीन पासवर्ड शेअर केलं, तर त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील.  

नेटफ्लिक्स यूझर्सना मोठा झटका 

नेटफ्लिक्सचा एखादा शो किंवा चित्रपट पाहण्यासाठी पर्सनल अकाउंट नसतं. अशावेळी बरेच जण मित्राचा किंवा ओळखीतल्या कुणाचाही लॉगीन आणि पासवर्ड घेऊन तो शो पाहतात. मात्र आता पुढे असं करताना नक्कीच अधिक पैसे मोजावे लागणार आहेत, याची पुष्टी नेटफ्लिक्सने केली आहे.  

काय आहे नवं फीचर 

नेटफ्लिक्स प्रोफाइल ट्रांसफर फीचरच (Netflix Profile Transfer Feature) घोषणा केली आहे.  या फीचरने पासवर्ड शेअरिंगला चाप बसेल, अशी आशा नेटफ्लिक्सला आहे. हे नवं फीचर  2023 पासून लागू करण्यात येणार असल्याचं म्हंटलं जात आहे. तसेच पासवर्ड शेअर करण्यासाठी सब अकाउंट क्रीएट करावं लागेल, ज्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. 

सब अकाउंटसाठी किती रुपये मोजावे लागणार, याबाबतची माहिती नेटफ्लिक्सकडून देण्यात आलेली नाही. मात्र पासवर्डसाठी 250-330 रुपये मोजावे लागू शकतात. मात्र भारतात याचे दर किती असणार, याबाबतची माहिती अजूनही समोर आलेली नाही.