मुंबई : प्रत्येक विदेशी गोष्टीला स्वदेशीचा पर्याय देणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलिने व्हॉट्सअॅपलाही पर्याय उपलब्ध करून दिला होता. पण हा पर्याय जास्त काळ टिकला नाही. त्यांना हे अॅप मागे घ्यावं लागलंय. पतंजलीने व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून 'किंभो' नावाचं अॅप मार्केटमध्ये आणलं. गुरूवारपासून हे अॅप युजर्सना वापरता येणार होतं पण याच्या अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे अॅप वापरण्याजोगे नसल्याचे युजर्सचे म्हणणे होते. या अॅपमध्ये काही त्रुटी नव्हत्या पण आम्ही प्रायोगिक तत्वावर हे लॉंच केलं होत असे पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी सांगितले.
Hi @KimbhoApp before trying to compete #WhatsApp, you can try to secure your app. It's possible to choose a security code between 0001 and 9999 and send it to the number of your choice #kimbhoApp pic.twitter.com/YQqK8lfIeI
— Elliot Alderson (@fs0c131y) May 30, 2018
This @KimbhoApp is a joke, next time before making press statements, hire competent developers... If it is not clear, for the moment don't install this app. #Kimbho #KimbhoApp pic.twitter.com/wLWzO6lhSR
— Elliot Alderson (@fs0c131y) May 30, 2018
यातील त्रुटी दुर करुन 'किंभो' अॅप लवकरच उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सध्या तरी या अॅपमधील डेटा सुरक्षीत राहत नव्हता असे युजर्सचे म्हणणे आहे. गुरूवारी हे अॅप प्ले स्टोअरवर आल्यानंतर मोठ्या संख्येने हे डाऊनलोडही करण्यात आलं होतं.