Honda WR-V Crash Test: ऑटो कंपन्या एका पेक्षा एक सरस गाड्या बाजारात आणत आहेत. पण असं असलं तरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य आहेत का? याबाबत चाचणी घेतली जाते. भारतीय कार ग्राहक त्यांच्या वाहनाच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेतात. कार घेण्यापूर्वी सेफ्टी फीचर्सपासून सेफ्टी रेटिंगपर्यंत, कार किती मजबूत आहे, या बाबींचा विचार करतात. नुकतंच लोकप्रिय होंडा WR-V(Honda WR-V) वाहनाची सुरक्षा चाचणी करण्यात आली. या चाचणीत ग्राहकांची पूर्णपणे निराशा झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या वाहनाला फक्त 1 स्टार रेटिंग मिळाले आहे. Honda WR-V कंपनीची क्रॉसओवर वाहन असून अनेकजण SUV मानतात. त्याची स्पर्धा ब्रेझा, नेक्सॉन आणि व्हेन्यू सारख्या वाहनांशी आहे. ही सर्वात स्वस्त कार असून इलेक्ट्रिक सनरूफ देते.
Honda WR-V वाहनाची नुकतीच लॅटिन NCAP क्रॅश चाचणी झाली आहे. क्रॅश चाचणीमध्ये याला फक्त 1 स्टार रेटिंग मिळाले आहे. चाचणी दरम्यान प्रौढ संरक्षण आणि बाल संरक्षणासाठी 41% मिळाले आहेत. त्याच वेळी, पादचाऱ्यांसाठी साइटसाठी 59% गुण मिळाले आहेत.कार प्रौढांसाठी, लहान मुलांसाठी किंवा रस्त्यावरील लोकांसाठी असुरक्षित असल्याचं यावरून दिसून येते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, WR-V ही गाडी Honda Jazz वर आधारीत आहे. होंडा Jazz ला ग्लोबल NCAP चाचणीत 4 स्टार मिळाले आहेत.
Nuevos resultados de #LatinNCAP:#Nivus logra cinco estrellas mientras que WR-V decepciona con solo una estrella
Reporte completo: https://t.co/DWCztbwypZ#VehiculosMasSeguros pic.twitter.com/LVvcsdR2Uz
— Latin NCAP (@LatinNCAP) September 15, 2022
Maruti च्या 'या' गाड्यांमध्ये सीट बेल्टचा Problem! 5002 युनिट्स परत मागवले, तुमची कार यात नाही ना
यापूर्वी Hyundai Tucson SUV ला लॅटिन NCAP क्रॅश चाचणीमध्ये 0 स्टार रेटिंग मिळाले होते. या गाडीने युरो NCAP चाचणीमध्ये 5 स्टार मिळवले होते. अशा क्रॅश चाचण्यांमुळे लोकांना त्यांची कार किती सुरक्षित आहे याची जाणीव होते.