Realme ने Festive Days Sale 2022 ची घोषणा केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, रियलमीच्या प्रोडक्ट्सवर 700 कोटी रुपयांची सूट दिली जाणार आहे. रियलमीच्या प्रोडक्ट्च्या सर्व प्रोडक्ट्सवर ही सवलत दिली जाणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये दावा केला आहे की 8 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या Festive Days Sale 2022 मध्ये कंपनी कोणत्याही प्रोडक्ट्सच्या खरेदीवर सूट देणार आहे. कंपनीच्या पोस्टनुसार, या फेस्टिव्ह सीझनमध्ये Realme स्मार्टफोन्सच्या खरेदीवर 10,000 रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. त्याच वेळी, AIoT प्रोडक्ट्सच्या खरेदीवर 12,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
Festive Days Sale 2022 मध्ये मिळणारी ही सूट 10-20 टक्के नसून तब्बल 700 कोटी रुपयांची असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीने अधिकृतपणे जाहीर केलय की, ही ऑफर सर्व Realme प्रोडक्ट्सवर अधिकृत वेबसाइट त्यासोबतच रिटेल स्टोअर्स, Flipkart आणि Amazon ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध असेल. सप्टेंबर महिन्याच्या 8 ते 16 तारखेदरम्यान कोणतेही Realme च्या कोणत्याही प्रोडक्टची खरेदी करून यूजर्स 'ही' ऑफर रिडीम करू शकतात.
The #realmeFestiveDays are back with HUGE offers worth ₹700 Crores*!!
Kickstart the festive season with some exciting discounts on your favourite #realme products from 8th-16th September! #realMeDiwali
Know more: https://t.co/cpgRzYYFos pic.twitter.com/gu6TPW08VA
— realme (@realmeIndia) September 6, 2022
Realme चे सीईओ आणि अध्यक्ष माधव सेठ म्हणाले की, आम्ही अलीकडेच अनेक उत्पादने लॉन्च केली आहेत, जी या सेलमध्ये ऑफरसह खरेदी करता येतील. रियलमीच्या फेस्टिव्ह डेज सेलमध्ये, यूजर्सना सर्व प्रोडक्ट्सवर 700 कोटी रुपयांची सूट मिळणार आहे. ही ऑफर यूजर्सना कंपनीच्या प्रोडक्ट्सवर गेल्या 4 वर्षांपासून विश्वास दाखवण्याच्या कृतज्ञतेमुळे दिली जाईल.
Realme नुकताच, दुसरा बजेट स्मार्टफोन Realme C33 लॉन्च केला आहे. भारतात 50MP कॅमेरा असलेला हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. त्याच्या बजेट प्रोडक्ट्समुळे, Realme 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत देशातील चौथा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. काउंटरपॉईंट रिसर्चने शेअर केलेल्या लेटेस्ट अहवालानुसार, गेल्या तिमाहीत, Realme ने वर्षभरात 23 टक्के वाढ नोंदवली आहे.
सध्या भारतीय बाजारपेठेत Realme चा 16 टक्के वाटा आहे. लेटेस्ट अहवालानुसार, Xiaomi आणि Samsung यांचा 19 टक्के मार्केट शेअर आहे. त्याच वेळी, तिसऱ्या स्थानावर असलेल्या Vivo चा बाजारातील 17 टक्के वाटा आहे. मे 2018 मध्ये लॉन्च झाल्यापासून, Realme साठी मागे वळून पाहिलं नाही. OPPO च्या उप-ब्रँड म्हणून भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर, कंपनीने लवकरच स्वतंत्र ब्रँड म्हणून आपला ठसा उमटवला.