मुंबई : शिओमीच्या फोन्सने स्मार्टफोनच्या जगात धुमाकूळ घातला आहे.
ई कॉमर्सवर या कंपनीचे फोन सर्वाधिक पसंत केले जातात. अवघ्या काही मिनिटामध्ये या फोन्सची झटपट विक्री झाली होती. आता शिओमी रेडमी नोट ५ लवकरच बाजारात येणार आहे.
रेडमी नोट ५ च्या टेस्टिंगदरम्यान काही फीचर्स लीक झाली आहेत. स्मार्टफोनमध्ये क्लॉलकॉमचा स्नॅपड्रेगन ६३२ प्रोसेसर देण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसारे रेडमी नोट 5 लॉन्च होण्यास उशिर झाला आहे. यामागील कारण म्हणजे कंपनीला क्लॉलकॉमचा स्नॅपड्रेगन ६३२ प्रोसेसरच्या अनाऊसमेंटची प्रतिक्षा आहे. या फोनची किंमत नोट ४ पेक्षा अधिक असणार आहे. बेस व्हॅरिएंट सुमारे १५,५९९ रूपयांपासून सुरू होणार आहेत.
रिपोर्ट्सनुसार, रेडमी नोट 5 या फोनचे २ व्हेरिएंट बाजारात उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी एक ३ जीबी रॅमसोबत ३२ जीबी इंटरनल मेमरी दिली जाणार आहे. तर दुसर्या व्हेरिएंटमध्ये ४ जीबी रॅमचा ६४ जीबी इंटरनल मेमरी मोबाईल उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
रेडमी नोट ५ मध्ये ५.९९ इंच फूल एचडी (1080×2160 पिक्सल) डिस्प्ले असणार आहे.
डिस्प्ले फूल व्हिजन असेल.
ड्युएल रिअर कॅमेरा, फ्रंट कॅमेरा ५ मेगा पिक्सल असेल
फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी असेल
फोनमध्ये अॅन्ड्रॉईड ७.१ नोगट असेल.