केवळ ७० रुपयांत वर्षभर अनलिमिटेड टूजी डाटा!

भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय. 

Updated: Aug 15, 2017, 09:18 AM IST
केवळ ७० रुपयांत वर्षभर अनलिमिटेड टूजी डाटा! title=

मुंबई : भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय. 

केवळ ७० रुपयांत एक वर्षभर अनलिमिटेड टूजी डाटा देण्याची घोषणा रिलायन्स कम्युनिकेशननं केलीय. 

ही ऑफर प्रीपेड युझर्ससाठी आहे. या योजनेचा फायदा ग्राहक १४ ते १६ ऑगस्टपर्यंत रिचार्ज करून मिळवू शकतात.

LTE सिमकार्ड असलेले ग्राहकही याचा वापर करू शकतील. परंत, त्यांना एक वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला १ जीबी डाटा मिळेल.