मुंबई : WhatsApp हे एक अस मेसेजिंग अॅप आहे, ज्याद्वारे आपण कोणालाही देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात मेसेज पाठवू शकतो, यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त इंटरनेटची गरज असते. यामुळेच WhatsAppची सर्वत्र चर्चा आहे, ज्यामुळे भारतातच काय तर अनेक देशांमध्ये WhatsApp हे प्रसिद्ध आहे. WhatsApp देखील आपले यूजर्स टिकवून ठेवण्यासाठी नवीन फीचर आणि सुविधा आणत असतो.
तसेच कंपनीने सर्व आयओएस आणि अँड्रॉइड यूजर्ससाठी मल्टी-डिव्हाइस बीटा टेस्ट आणली आहे. परंतु आता कंपनी अॅपमधील काही फीचर्स काढून टाकण्याचा विचार केला आहे, ज्यामुळे WhatsApp यूजर्सवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
कंपनीने हे फीचर एक वर्षापूर्वी अॅपमध्ये आणले होते, परंतु ते आत कंपनी काढून टाकणार आहे.
यापुढे यूजर्स WhatsApp मध्ये मेसेंजर रूम सर्विस वापरू शकणार नाही. WABetaInfo च्या बातमीनुसार, WhatsApp मेसेंजर रूम शॉर्टकट आता चॅट शेअर सीटवरून काढला जाणार आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही आवृत्त्यांमधून काढले जाईल.
हा व्हॉट्सअॅप शॉर्टकट मे 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता, ज्यामुळे वापरकर्त्यांना फार कमी वेळात फेसबुक मेसेंजरवर 50 सहभागीं लोकांचा गट तयार करता येत होता. परंतु हे फीचर आता WhatsAppमधून काढून टाकले जाणार आहे. असा अंदाज लावला जात आहे की कदाचित हा शॉर्टकट काही इतर फीचर शॉर्टकट लागू करण्यासाठी काढला गेला आहे.
WABetaInfo च्या मते, कंपनी या फीचरच्या मदतीने यूजर्सवर लक्ष ठेवत होती आणि आकडेवारीनुसार, हे फीचर यूजर्स करुन वापरले जात नव्हते, ज्यामुळे याला काढण्याचा निर्णय कंपनीने घेतला असावा. बातमीनुसार, हे फीचर व्हॉट्सअॅप बीटा iOS 2.21.190.11 आणि व्हॉट्सअॅप बीटा अँड्रॉइड 2.21.19.15 या दोन्ही बीटा व्हर्जनवर बंद करण्यात आला आहे.
या चॅट मेनूमधून व्हॉट्सअॅपवर मेसेंजर रूम शॉर्टकट काढून टाकल्यानंतर, यूजर्स आता डॉक्यूमेंट्स, कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ आणि कॉन्टॅक्टचे शॉर्टकट पाहू शकतील.
यूजर्स त्यावर टॅप करून त्यांच्या संपर्कांसह डेटा आणि माहिती शेअर करण्यास सक्षम असतील. याव्यतिरिक्त, व्हॉट्सअॅपने नवीनतम iOS बीटा आवृत्तीवर एक नवीन फीचर आणले आहे, जे यूजर्सना टेम्पररी ग्रुप तयार करताना इमोजी किंवा स्टिकर वापरुन पटकन सेट करण्याची परवानगी देते.