टीव्हीएसच्या अपाचे बाईकचं फ्यूल इंजेक्शन अवतार लॉन्च

टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांची लोकप्रिय बाईक टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४वी नव्या रूपात लॉन्च केली आहे.

Updated: Nov 6, 2017, 05:37 PM IST
टीव्हीएसच्या अपाचे बाईकचं फ्यूल इंजेक्शन अवतार लॉन्च title=

नवी दिल्ली : टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांची लोकप्रिय बाईक टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४वी नव्या रूपात लॉन्च केली आहे.

ही बाईक कंपनीने आता फ्य़ूल इंजेक्शनसोबत लॉन्च केली आहे. अपाचे आरटीआरचं हे एफआय व्हर्जनची नवी दिल्लीतील किंमत १.०७ लाख रूपये इतकी आहे. 

टीव्हीएस अपाचे बाईकचं हे नवं व्हर्जन काही निवडक शहरांमध्येच उपलब्ध होणार आहे. यासाठी तुमच्या जवळच्या टीव्हीएस डिलरला जाऊन भेटावं लागेल. टीव्हीएसने अपाचे बाईकचं हे नवं मॉडेल अधिक शक्तीशाली बनवलं आहे. इतकेच नाहीतर या बाईकची एफिशिअन्सीही अधिक चांगली केली आहे. 

TVS Apache RTR 200 Fi4V  नावाच्या या बाईकमध्ये कॉर्ब्युरेटेद व्हर्जनसारखंच इंजिन ठेवण्यात आलंय. दोन्ही मॉडेलमध्ये हा फरक आहे की, एफआय मॉडल लहान वाइजरसोबत येतं. हे वाईजर डिजिटल इन्ट्रूमेंट क्लस्टरवर लावण्यात आलंय. या नव्या अपाचे मॉडेलचे पर्ल व्हाईट आणि मॅट येलो कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. नव्या बाईकचा लूक जुन्या बाईकप्रमाणेच आहे. 

TVS Apache RTR 200 Fi4V बाईकमध्ये ट्विन स्प्रे पोर्ट इलेक्ट्रॉनिक फ्यूल इंजेक्शन तंत्र दिलं आहे. यात २०० सीसीचं सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलंय. जे २०.७ बीएसपीची पावर जनरेट करण्यासोबतच १८.१ न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करतं. टीव्हीएसचा दावा आहे की, अपाचेचं हे नवं मॉडेल केवळ ३.९ सेकंदात ० ते ६० किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडतं. या बाईकची टॉप स्पीड १२९ किलोमीटर प्रति तास आहे.