TVS ने लॉन्च केलं Victor चं नवं मॉडल

सणासुदीच्या दिवसांत नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. हेच लक्षात घेऊन बाईक निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपली नवी बाईक लॉन्च केली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 7, 2017, 07:34 PM IST
TVS ने लॉन्च केलं Victor चं नवं मॉडल title=
File Photo

चेन्नई : सणासुदीच्या दिवसांत नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. हेच लक्षात घेऊन बाईक निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपली नवी बाईक लॉन्च केली आहे.

टीव्हीएस मोटर्सने आपली लोकप्रिय ११० सीसी बाईक व्हिक्टर नव्या रुपात बाजारात उतरवली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच स्टार सिटी प्लसही नव्या रुपात लॉन्च केली होती.

कंपनीने म्हटले आहे की, टीव्हीएस व्हिक्टर नव्या रुपात बाजारात उपलब्ध करुन देत आहोत. यामध्ये प्रिमियम स्टीकर, क्रोम क्रॅश गार्ड (अपघातात पायांना कव्हर करण्यासाठी गार्ड), डेलाईट रनिंग लाईट, सीटच्या मागे हँडल असे विविध फीचर्स देण्यात आले आहेत.

टीव्हीएस व्हिक्टरमध्ये तीन वॉल्व ऑईल कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. "नव्या गाडीत केवळ डिस्क ब्रेकचा पर्याय उपलब्ध आहे. तर, इतर मॉडेल्समध्ये डिस्क आणि ड्रम हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत."

टीव्हीएस मोटर कंपनीचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हलधर यांनी सांगितले की, टीव्हीएस मोटर कंपनी नेहमी ग्राहकांना चांगला अनुभव आणि चांगली टेक्निक उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करते. टीव्हीएस व्हिक्टरच्या नव्या बाईकमध्ये ग्राहकांना गुणवत्ता आणि प्रदर्शनासोबतच स्टाइलिश लूकही मिळणार आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत ५७,१०० रुपये आहे.