Twitter Blue Tick News: एलन मस्क यांच्या मालकीची मायक्रो-ब्लॉगिंग साइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शुक्रवारी गोंधळ झाला. twitter ने अनेकांची Blue Tick काढून टाकली आहे. यात अनेक मोठ्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. भारतात, ब्लू व्हेरिफाईड स्टेटस मिळवण्यासाठी दरमहा 900 रुपये भरावे लागणार आहेत. एलन मस्क यांनी आधीच जाहीर केले होते की, यापुढे ब्लू टिक्स काढून टाकली जाईल. आतापर्यंत लाखो ट्विटर यूजर्सची ब्लू टिक्स हटविण्यात आली आहे.
ट्विटरने काही सेलिब्रेटी आणि संस्थांना दिलेले ब्लू टिक हटवले आहे. यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार या सेलिब्रेटींसह सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली यांचा समावेश आहे. राहुल गांधी, केजरीवाल, योगी आदित्यनाथ यांच्या नावासमोरील ब्लू टिक हटवले गेले आहे.
ब्लू टिकसाठी ज्यांनी पैसे मोजलेत त्यांच्याच प्रोफाईलवर ब्लू टिक कायम राहणार असल्याचं ट्विटरनं स्पष्ट केलंय. त्यामुळे आतापर्यंत ब्लू टिकसाठी मिळणारी मोफत सुविधा बंद करण्यात आलीय. आता या सर्वांना ब्लू टिकसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी पैसे मोजावे लागतील. ब्लू टिकसाठीचे पैसे विभागानुसार वेगवेगळे आहेत. भारतात IOS साठी महिन्याला 900 रुपये, वेबसाठी 650 रुपये मोजावे लागतील. तेच वर्षाला IOS साठी 9400 आणि Android युझर्ससाठी महिन्याला 900 आणि वर्षाला 9400 रुपये मोजावे लागणारेत.
4 लाखांहून अधिक यूजर्सचे ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे. काही ख्यातनाम व्यक्तींना एलन मस्क यांनी ट्विटर ब्लू सदस्यत्वाची ऑफर दिली आहे. ते म्हणाला, मी वैयक्तिकरित्या विल्यम शॅटनर, लेब्रॉन जेम्स आणि स्टीफन किंग यांना पैसे देत आहे.
एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीला आर्थिक संकटाचा सामना करावा होता. हे आर्थिक संकट भरुन काढण्यासाठी हे पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. यातील मोठा बदल म्हणजे 'ब्लू टिक' सबस्क्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
मायक्रोब्लॉगिंग साइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी यापूर्वीच याची घोषणा केली होती. जर ब्लू टिक लावायची असेल तर त्यासाठी मासिक शुल्क भरावे लागेल, असा आग्रह धरला होता. मासिक शुल्क न घेणार्यांची ब्लू टिक काढली जाईल. ते म्हणाले की, 20 एप्रिल 2023 नंतर ज्या खात्यांनी अद्याप सशुल्क सदस्यता घेतलेली नाही अशा खात्यांमधून ब्लू टिक्स हटविल्या जातील.