Twitter Verified Follows 'No One' : आता बातमी समाज माध्यमातून. Twitter ने दे धक्का दिला आहे. ट्विटर व्हेरीफाईडकडून सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आली आहेत. कालपासून जवळपास 2 लाख 25 हजार अकाउंट्स अनफॉलो करण्यात आलेत. आता ट्विटर व्हेरिफाईड कुणालाही फॉलो करणार नाही. ट्विटरने यापूर्वी जवळपास 4 लाख 20 हजार व्हेरिफाईड अकाउंट्सना फॉलो केले होते. ('Twitter Verified' has mass unfollowed legacy all verified accounts )
ट्विटर ब्लू पॉलिसी आणल्यानंतर, कंपनीनं 1 एप्रिलपासून सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद करण्याचा आणि त्या यूजर्ससाठी चेकमार्क म्हणजे ब्लू टिक काढून टाकण्याचा इशारा दिला होता. आता सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात येत असल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
'Twitter Verified' has mass unfollowed legacy all verified accounts within a few hours.
The account has unfollowed nearly 225,000 accounts since yesterday pic.twitter.com/tOTQp2wJV3
— ANI (@ANI) April 7, 2023
जगातील श्रीमंतापैकी एक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर एकानंतर एक धक्कादायक निर्णय घेतले आहे. ट्विटरचा पदभार हाती घेतल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. धक्कादायक निर्णयामुळे एलॉन मस्क नेहमीच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरचा आयकॉनिक लोगो ब्लू बर्ड हटवा. आता Doge Image ट्विटर होमपेजवर आणली. आता तर ट्विटरने पुन्हा आपला आयकॉनिक लोगो ठेवलाय. मात्र, यासोबतच आणखी एक बदल केला आहे. 'ट्विटर व्हेरीफाईड'कडून सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आले आहेत. म्हणजेच, आता ट्विटर व्हेरिफाईड कोणालाही फॉलो करणार नाही.
ट्विटरने याआधी 1 एप्रिलपासून सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद करण्याचा इशारा दिला होता आणि ज्यांच्याकडे ते अजूनही आहेत परंतु ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी पैसे देत नाहीत त्यांच्यासाठी चेकमार्क काढून टाकण्याचा इशारा दिला होता. पण आता ट्विटरने सगळ्यांनाच अनफॉलो केल्यामुळे ट्विटर व्हेरिफाईड त्यांना फॉलो करत आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे.
प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी, कंपन्या आणि ब्रँड, वृत्तसंस्था आणि सार्वजनिक हिताची अन्य अकाऊंट व्हेरिफाईड आहेत हे ओळखण्यासाठी यूजर्सना मदत करण्यासाठी 2009 मध्ये Twitter ने सर्वप्रथम व्हेरिफाईड अकाऊंट सादर केली. त्यामुळे बनावटआणि खोटी अकाऊंट ओळखणे सोपे झाले होते. दरम्यान, व्हेरिफाईड अकाऊंटसाठी Twitter ने पैसे कारण्यास सुरुवात केली. याची घोषणाही केली. परंतु आता Twitter Verified आता यापुढे असणार नसल्याने अनेकांना धक्का बसला आहे.