मुंबई : जगभरात पुढील काही महिन्यात लाखो मोबाईल फोनवर व्हॉटसअप वापरता येणार नाही. असं होण्याचं कारण आहे, व्हॉटसअप अनेक जुन्या फोनमध्ये सपोर्ट करणार नाहीय, चालणार नाहीय. व्हॉटसअपची मालकी फेसबूककडे आहे, फेसबूकने या विषयी ही माहिती दिली आहे.
एक फेब्रुवारीपासून iOS 8 किंवा त्यापेक्षा जुन्या आयफोनवर, तसेच 2.3.7 किंवा त्यापेक्षा आधीच्या वर्जनवाल्या अँड्राईड फोनवर देखील व्हॉटसअप चालणार नाही. कंपनीने हे सुद्धा सांगितलंय की, विंडोजवर चालणारे जे फोन आहेत, त्यावर 31 डिसेंबर 2019 पर्यंत व्हॉटसअप बंद होणार आहे.
व्हॉटसअपने आपली वेबसाईट FAQ सेक्शनमध्येही या बाबतीत माहिती दिली आहे.
यात लिहिलंय, जुन्या वर्जनच्या एँड्रॉईड आणि आयफोनवर 1 फेब्रुवारी, 2020 नंतर अकाऊंट उघडता येणार नाही, तसेच यापूर्वी असं अकाऊंट असेल, तर ते री-वेरीफाय देखील केलं जाईल. फेसबूकने व्हॉटसअॅपला 2014 मध्ये 19 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केलं होतं. कंपनी व्हॉटसअपला आपलं दुसरं मेसेजिक प्लॅटफॉर्म मेसेंजर आणि इन्ट्राग्रामसोबत इंटीग्रेट करू इच्छीते.
व्हॉटसअपने दिलेल्या माहितीनुसार जगातील 180 पेक्षा जास्त देशातील, 1 अब्जपेक्षा जास्त लोक या अॅपचा वापर करत आहेत. मायक्रोसॉफ्ट देखील या महिन्यात विंडोज 10 वर चालणाऱ्या मोबाईल फोनचा सपोर्ट बंद करणार आहे.