मुंबई : व्हॉट्सअॅप गेल्या काही दिवसांपासून नवनवीन अपडेट्स घेऊन येत आहे. प्रायव्हसी पॉलिसीवरून वादात सापडलेलं व्हॉट्सअॅप आता काहीतरी वेगळं करू पाहतंय.
व्हॉट्सअॅपने नुकतेच आणलेले ५ फिचर्स पाहूयात
1. WhatsApp चॅट बॅकअप पासवर्ड
व्हॉट्सअॅपवर तुम्हाला याआधीही चॅट बॅकअप घेता येत असे, मात्र त्याला कुठलंही संरक्षण नव्हतं. आता मात्र व्हॉट्सअॅपने बॅकअप चॅट्सनाही पासवर्ड ठेवण्याची सुविधा दिली आहे. ज्यामुळे तुमच्या व्हॉट्सअॅप चॅट्सप्रमाणेच आता तुमचे बॅकअप चॅट्सही पासवर्डने सुरक्षित राहतील.
2. इंस्टाग्राम रिल्स
ज्याप्रमाणे तुम्ही इंस्टाग्राम या अॅप्लिकेशनवर रिल्स म्हणजेच छोटे-छोटे व्हीडिओ पाहू शकता, तसंच आता व्हॉट्सअॅपवरही करू शकणार आहात. नुकतंच व्हॉट्सअॅपने इंस्टाग्राम रिल्सलासुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवर समाविष्ट करून घेतलं आहे.
3. आर्काईव्ह चॅट्स
काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने आर्काईव्ह चॅट फिचर लाँच केलेलं. यामुळे तुम्ही कोणतंही चॅट आर्काईव्हमध्ये ठेऊ शकता. ज्यामुळे ते मेसेज डिलीटही होणार नाहीत. हे चॅट्स आर्काईव्हमध्ये राहतात, जे तुम्ही कधीही पाहू शकता. पण तुमच्या मुख्य चॅट लिस्टमध्ये दिसत नाहीत.
4. मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट
व्हॉट्सअॅप आता एकाच वेळी वेगवेगळ्या डिव्हाईसवरही सपोर्ट करतं. म्हणजेच तुम्ही कोणत्या दुसऱ्या डिव्हाईसवर व्हॉट्सअप वापरत असाल, तर ते वापरताना तुम्हाला रिअल टाईम मॉनिटर करता येतं.
5. ऑटोमॅटिक मेसेज डिलीट
आता व्हॉट्सअॅपचे कुठले चॅट्स तुम्हाला वारंवार डिलीट करत बसायची गरज नाही. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने ऑटोमॅटिक मेसेज डिलीटचा पर्याय आणलेला. जेणेकरून काही कालावधीनंतर ते चॅट्स आपोआपच डिलीट होऊन जातात.