WhatsApp Profile वर वापरा आता तुमचा 'अवतार'; पाहा कसं आहे हे भन्नाट फिचर

व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नवीन भन्नाट फिचर (Whatsapp New Feature) आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये  इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp च्या माध्यमातून येणारे 'अवतार' या नवीन फीचरमध्ये तुम्ही तुमचा प्रोफाईल फोटो ठेवू शकणार आहे. 

Updated: Aug 15, 2022, 09:55 AM IST
WhatsApp Profile वर वापरा आता तुमचा 'अवतार'; पाहा कसं आहे हे भन्नाट फिचर title=

Whatsapp Avatar Feature : व्हॉट्सअ‍ॅप  (Whatsapp) प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. आता मेटा (Meta) कंपनीची मालकी असलेलं व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नवीन भन्नाट फिचर (Whatsapp New Feature) आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये  इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp च्या माध्यमातून येणारे 'अवतार' या नवीन फीचरमध्ये तुम्ही तुमचा प्रोफाईल फोटो ठेवू शकणार आहे. 

व्हॉट्सअॅपशी संबंधित असलेल्या Wabetainfo शेअर केलेल्या माहितीमध्ये, whatsappa Profile वर अवतार या नव्या फिचर तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे लवकरच तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर वर तुमच्या अंदाजातील विशेष अवतार (Whatsapp Profile Photo Avatar) ठेवता येणार आहे. 

Whatsapp देखील हे फीचर्स लाँच करू शकते

व्हॉट्सअॅप आपल्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर अवतार वैशिष्ट्यासह अनेक नवीन वैशिष्ट्ये सादर करू शकते. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रुप पोल फीचर, ज्यामध्ये युजर्स ग्रुपमध्ये प्रश्न विचारून कोणत्याही प्रश्नासाठी पोल तयार करू शकतील. तुम्हाला सांगतो, पोल फीचर ट्विटर आणि यूट्यूबवर आधीच उपलब्ध आहे. मतदानाव्यतिरिक्त, व्हॉट्सअॅपमध्ये ट्विटरसारखे 'एडिट' फीचर देखील असण्याची अपेक्षा आहे. टायपो-एररसह पाठवलेला मेसेज एडिट करण्याची सुविधा लवकरच व्हॉट्सअॅपवर दिली जाणार असल्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे.