मुंबई : तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
शाओमी कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली पकड आणखीन मजबूत करत वर्चस्व निर्माण करण्यासाठी एक खास ऑफर सुरु केली आहे.
शाओमी कंपनीने मंगळवारी एमआय एक्सचेंज प्रोग्रामची घोषणा केली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना जुना फोन एक्सचेंज करुन नवा फोन घेता येणार आहे. या ऑफरसाठी कंपनीने दिल्लीतील कंपनी कॅशीफायसोबत पार्टनरशीप केली आहे.
Take part in the great #MiExchange Program! Get the resale value of your old phone estimated instantly at a Mi Home near you and exchange it for a new Xiaomi smartphone today!#MiExchange #Xiaomi #Smartphone #BestExchangePrices #InstantExchange pic.twitter.com/Q1mpiz1KAU
— Cashify (@Cashify_) November 22, 2017
एमआय एक्सचेंज ऑफरनुसार शाओमीचा नवा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आपल्या जवळील एमआय होम स्टोअरमध्ये जावं लागणार आहे. एमआय होममध्ये कॅशीफायची टीम तुमच्या जुन्या फोनची किंमत ठरवेल आणि त्यानंतर तुम्हाला किंमतीनुसार नव्या फोनवर सूट देण्यात येणार आहे.
तुम्ही एमआय होम जाण्यापूर्वी आपल्या फोनची किंमत जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला www.cashify.in वर जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्ही फोनची किंमत जाणून घेऊ शकता. इतकेच नाही तर घरी बसूनही तुम्ही पिकअप सेवेचा लाभ घेऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला १०० रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.