Thane Kopri Bridge : ठाणे कोपरी पूल येथे टाकण्यात येणाऱ्या गर्डर मुळे ठाणे शहरातील वाहतूक ठप्प

ठाणे कोपरी पूल येथे टाकण्यात येणाऱ्या गर्डर मुळे आज ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आलेली आहे. 

Updated: Nov 20, 2022, 03:46 PM IST
Thane Kopri Bridge : ठाणे कोपरी पूल येथे टाकण्यात येणाऱ्या गर्डर मुळे ठाणे शहरातील वाहतूक ठप्प title=
Thane Kopri Bridge Traffic in Thane city has come to a standstill due to the girders nz

Thane Kopri Bridge : ठाणे कोपरी पूल येथे टाकण्यात येणाऱ्या गर्डर मुळे आज ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आलेली आहे. ठाण्यातील वेगवेगळ्या पॉईंटवर बंदोबस्त व इंस्ट्रक्शन देखील देण्यात येणार आहे. नाशिकच्या दिशेने येणारे मुंब्रा बायपास वरून वाहतूक वाढवण्यात येत आहे तसेच मुंबईच्या दिशेने येणारे वाहतूक एलबीएस तसेच ऐरोली मार्गे वळण्यात येत आहे. सात तासाचा ड्रायव्हरजन असून या कामासाठी ठाण्यातून 200 पोलीस कर्मचारी तसेच 40 अधिकारी कामकाजासाठी नेमलेले आहेत. (Thane Kopri Bridge Traffic in Thane city has come to a standstill due to the girders nz)

 

सात गडर या ठिकाणी लागणार आहे तर त्यातील तीन आज रात्री व चार गर्डर उद्या रात्री लागणार आहेत. त्यासाठी आज जे ट्राफिक ची व्यवस्था आहे तीच व्यवस्था उद्या देखील असणार आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जर अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा व नियमांचे पालन करा. कोपरे ब्रिज हा खूप अरुंद रस्ता होता व या ठिकाणी वाहतूक कोंडी होते परंतु या रस्त्याचं रुंदीकरण होत असल्यामुळे या ठिकाणाहून दुप्पट क्षमताने वाहतूक करण्यास मदत होईल.