मुंबई : MP Navneet Rana's trouble increases, non-bailable warrant issued : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसऱ्यांदा नवीनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (non-bailable warrant) जारी करण्यात आला आहे. जात प्रमाणपत्र प्रकरणी ( caste certificate case) राणा हा वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना अटक होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि वडील हरभजन सिंह यांच्या विरोधात दोन महिन्यात दोनवेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जात प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि वडील हरभजन सिंह यांच्या विरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वडील देखील या प्रकरणात आरोपी आहेत. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदार संघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.