सांगली: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या मुलीच्या वारसांना ४ लाख रुपये व्याजासाहित भरपाई देण्याचे आदेश सांगलीच्या ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. सांगलीतील सोनाई मोहिते हिचा शस्त्रक्रीयेदरम्यान भूलीच्या औषधाची अतिरिक्त मात्रा दिली गेली. त्यातच तिचा मृत्यू झाला होता.
यासंदर्भात पीडित मुलीच्या वडलांनी ग्राहक पंचायतीत धाव घेतली होती. तब्बल वीस वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर मयत मुलीच्या आई वडिलांना अखेरीस न्याय मिळाला आहे. ग्राहक न्यायालयाने डॉ. कांती शहा, डॉ.अकलेश शहा आणि डॉ. श्रीकांत ठाणेदार या डॉक्टरांना दोषी ठरवत पीडित कुटुंबियांना 30 दिवसांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.