पुणे: आतापर्यंत 'एकला चलो रे' चा नारा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका अचानक मवाळ झालेली दिसली. ते शनिवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंना लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर भाजपाशी युती करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर उद्धव यांनी म्हटले की, गेली पाच वर्ष भाजपसोबत भांडत असलो तरी तरी निवडणुकीत एकत्र येऊ किंवा नाही ते माहिती नाही. यावेळी त्यांनी महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचं वितरण, नाणार या मुद्द्यांवरुनही सरकारला लक्ष्य केले. महाविद्यालयात वाटण्यात येणाऱ्या गीतेच्या प्रती संस्कृतमध्ये आहेत का गुजरातीमध्ये, हे तपासून पाहावे लागेल, असा टोला उद्धव यांनी लगावला.