Crime News : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने (Shraddha Walkar Murder Case) संपूर्ण देश हादरला. श्रद्धा वालकरचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawala) याने तिची हत्या करुन मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. एका मुलाने आपल्या वडिलांचा मृतदेह अनेक दिवस फ्रीजमध्ये जतन करुन ठेवला होता. मुलाने हे कृत्य का केले याचा तपास करताना जे सत्य उघडकीस आले ते पाहून पोलिसही हादरले आहेत. नेदरलँड मधील हे धक्कादायक प्रकरण आहे.
स्काय न्यूजने याबबातचे वृत्त दिले आहे. नेदरलँडच्या लँडग्राफ येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत व्यक्ती हा 101 वर्षाचा आहे. तर, या मृत व्यक्तीचा मृतदेह फ्रीजमध्ये जतन करुन ठेवणाऱ्या मुलाचे वय 82 वर्षे आहे. वडिलांचा मृतदेह त्याने तब्बल 18 महिने फ्रीजमध्ये जतन करुन ठेवला होता.
मृत व्यक्ती हा सतत आजारी होता. त्यांचे फॅमिली डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. वृद्धपकाळाने त्याचे निधन झाले. मात्र, त्याच्या मुलाने वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले नाहीत. मुलाने आपला वडिलांचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला होता. फॅमिली डॉक्टरने वृद्धाच्या तब्येतीची विचारपूस केली असता त्यांता मृत्यू झाल्याचे त्यांना कळाले.
या मुलाने आपल्या वडिलांचा मृतदेह फ्रीजमध्ये का ठेवला होता याबबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 18 महिन्यांपूर्वीच वडिलांचा मृत्यू झाला. मात्र, मी माझ्या वडिलांच्या मृतदेहावर अत्यंत संस्कार केले नाहीत. त्यांच्या मृत्यू हा वृद्धापकाळ अर्थात नैसर्गिक कारणामुळे झाला आहे. यामुळे मी त्यांचा मृतदेह फ्रीजमध्ये जतन करुन ठेवण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी पोलिसांनी सांगितले. माझे वडिल मला अत्यंत प्रिय होते. त्यांच्या जाण्याचे दुख: मला सहन झाले नाही. वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले तर मला त्यांचा चेहरा कधीच पाहता येणार नाही. त्यांच्याशी बोलता येणार नाही म्हणून मी मृतदेहावर अंत्यंसंस्कार न करता मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मी फ्रीज उघडून वडिलांना पहायचो त्यांच्याशी नियमीत संवाद साधायचो असेही त्याने पोलिसांना सांगितले.
वडिलांचे निधन झाले मात्र, त्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले नाहीत अशी माहिती शेजाऱ्यांना मिळाली होती. यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिस याच्या घरी पोहचले आणि फ्रीजमध्ये ठेवलेला मृतदेह ताब्यात घेतला.