Russia Ukraine war : युक्रेनचे 40 सैनिक मारले, अनेक जण जखमी

Russia Ukraine Conflict  : रशिया - युक्रेनमधील वादानाचे रुपांतर युद्धात झाले आहे. (Russia declares war on Ukraine) रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केल्यानंतर आता नवी माहिती पुढे आली आहे.  

Updated: Feb 24, 2022, 03:58 PM IST
Russia Ukraine war :  युक्रेनचे 40 सैनिक मारले, अनेक जण जखमी title=

मास्को : Russia Ukraine Conflict  : रशिया - युक्रेनमधील वादानाचे रुपांतर युद्धात झाले आहे. (Russia declares war on Ukraine) रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केल्यानंतर आता नवी माहिती पुढे आली आहे. रशियाच्या  हल्ल्यात युक्रेनचे 40 सैनिक मारले गेले आहेत. 40 सैनिक मारले गेल्याच्या वृत्ताला युक्रेनकडून दुजोरा देण्यात आला आहे.

 युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाच्या सल्लागारांनी सांगितले की, 40 हून अधिक युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत. तर डझनभर जखमी झाले आहेत, अशी माहिती रॉयटरने दिली आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेननेही रशियाला जशाच जोरदार प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. रशियाची पाच विमाने आणि एक हेलिकॉप्टर आम्ही पाडले, असा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनमधील लुहान्स प्रांतामध्ये आम्ही ही विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

एकाच वेळी रशियाने अनेक बाजूंनी युक्रेनवर आक्रमण केले आहे.  जवळजवळ  25 ठिकाणी हल्ले केले आहेत. आमच्यावर हल्ला करुन जबरदस्तीने आमच्या देशावर ताबा मिळवण्याचा हा रशियाचा डाव आहे. आमच्या देशातील शांततापूर्ण शहरांवर रशिया सध्या सर्व बाजूंनी हल्ले करत आहे, असे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान,  रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी लष्करी कारवाईची औपचारिक घोषणा केल्यानंतर रशियाकडून जोरदार हल्ला चढविण्यात आला. यासोबतच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरुद्धच्या रशियन कारवाईत कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर जबर उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला