ओवल : जम्मू काश्मिर येथील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण वाढत आहे. यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा तणाव खूप भयावह असून भारत मोठी पाऊले उचलण्याच्या तयारीत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. भारताने आपले 50 जवान गमावले आहेत. याबद्दल अनेकजण बोलत आहेत. तिथल वातावरण अतिशय नाजूक आहे. काश्मिरमध्ये जे काही झाले आहे त्यामुळे भारत-पाकमध्ये तणाव आहे. हे खूप खतरनाक असल्याचे ट्रम्प म्हणाले. शुक्रवारी ओवलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलताना पुलवामा हल्ल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. 40 सीआरपीएफ जवान शहीद झाल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. आता हे थांबायला हवे असेही ते म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावाखाली आहे. काही दिवसांपूर्वीच अनेकजण मारले गेले आहेत. हे थांबायला हवे असे ते म्हणाले. आमचे सरकार दोन्ही देशांच्या संपर्कात असून काश्मिर घाटीमधील तणावाचे वातावरण लवकरच संपेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने घेतली. दहशतवाद् मिटवण्यासाठी पाकिस्तान कमी पडत असल्याने ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेने पाकिस्तान सोबतचे आपले संबध सुधारले असून पाकिस्तानचे नेता आणि अधिकाऱ्यांसोबत बैठकीची तयारी केली जात असल्याचे ते म्हणाले.
US President Donald Trump: There’s a terrible thing going on right now between Pakistan and India. It's a very very bad situation and it is a dangerous situation between the two countries. We would like to see it stop. Lot of people were just killed. #PulwamaAttack pic.twitter.com/6O3ZofyD41
— ANI (@ANI) February 23, 2019
आम्ही पाकिस्तानला देत असलेली 1.3 अरब डॉलरची मदत थांबवल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. आम्ही पाकिस्तानला वर्षाला 1.3 अरब डॉलरचे सहाय्य करायचो. कारण त्यांच्याकडून अपेक्षित असलेली मदत मिळत नव्हती.