बेल्जियम : आजकाल सारेच जण वर्षातून एक सहल हमखास प्लॅन करतात. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालकही सतत काही भन्नाट ऑफर्सचा विचार करत असतात. अशातच 'सोलो ट्रीप'चा आनंद घेण्याचा ट्रेन्ड आहे. अशा एकाट्याने प्रवास करणार्यांसाठी बेल्जिअममधील एका हॉटेलने भन्नाट ऑफर आणली आहे.
बेल्जियममधील या हॉटेलनं त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना मासे भाड्याने द्यायला सुरूवात केली आहे. ‘जर तुम्ही रुममध्ये एकटे असाल आणि तुम्हाला कोणाची सोबत हवी असेल तर तुम्ही गोल्ड फिश भाड्यानं घेऊ शकता’,अशी जाहिरात हॉटेलनं केली आहे. या अनोख्या जाहिरातीनं सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
ब्रसेल्सच्या चार्लरोई एअरपोर्ट हॉटेलमध्ये ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. सुमारे २५० रुपयांमध्ये एका रात्रीसाठी ‘गोल्डफिश’चा बाऊल पाहुण्यांना भाड्यानं मिळतो. एकटेपणा घालवण्यासाठी किंवा विरंगुळा म्हणून अनेक पाहुणे भाड्यानं बाऊल विकत घेतात. या ऑफरला पर्यटकांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. हॉटेलमध्ये येणारे अनेक पाहुणे मासे भाड्याने विकत घेतात. अनेक वर्षांपासून अशा प्रकारची ऑफर पर्यटकांना दिली जाते अशी माहिती द इंडिपेडंट’ला दिली आहे.
My friend is staying in a hotel in Belgium. They've offered her the option of renting a fish for the night, in case she's lonely. #noshit pic.twitter.com/DG74iRSfhY
— Michelle Cooke (@Mich_Cooke) September 2, 2017
मायकल कूकी या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या फोटोला १३ हजारांहून अधिक रिट्विटस मिळाल्या आहेत. काहींना ही ऑफर फारच आवडली आहे तर काही प्राणीप्रेमी संघटनांनी या प्रकारावर टीका करायला सुरूवात केली आहे.