मुंबई : आजकाल ऑनलाइन डेटिंगचा ट्रेंड सुरु आहे, येथे लोक अनोळखी लोकांशी ओळख करतात आणि एकमेकांशी बोलतात, तसेच एकमेकांना डेट करतात. परंतु या ऑनलाईन डेटिंगचा काही भरोसा नसतो, इथे कधी कोणाची फसवणूक होते, तर कधी कोणाची प्रेम कहाणी यशस्वी होते. खरंतर येथे लोक समोरील व्यक्तीच्या फोटोला पाहून त्याच्यासोबत बोलू लागतात किंवा त्याच्या प्रेमात पडतात, तसेच येथे कोणालाच कोणी आधीपासून ओळखत नसतं, त्यामुळे येथील व्यक्तीवर विश्वास ठेवणे हे कठीणच आहे. असंच एक प्रकरण एका व्यक्तीसोबत घडलं, ज्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
खरंतर तिच्या या प्रेम कहाणीची सुरुवात दोन वर्षांपूर्वी एका ऑनलाइन भेटीने होते. हळुहळु ते एकमेकांशी बोलू लागतात आणि हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. कोरोनामुळे ते दोघेही एकमेकांना भेटू शकले नाहीत, त्यामुळे लॉकडाऊननंतर तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बोलावले.
परंतु हे ऐकून त्याची गर्लफ्रेंड अचानक गायब झाली. तिचा नंतर कोणताही कॉन्टॅक्ट झाला नाही आणि ती त्या डेटिंग ऍपवरुन देखील गायब झाली.
ज्यामुळे आयर्लंडमध्ये राहणारा रॉब अस्वस्थ झाला आणि त्याने ब्रिटनमध्ये राहणाऱ्या साराचा शोध सुरू केला. दोघांची भेट टिंडरवर झाली. सारा ना फोन उचलत होती ना रॉबच्या मेसेजला उत्तर देत होती. ज्यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंडचा शोध घेतला. त्यानंतर या तरुणासमोर त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल जी माहिती समोर आली ती ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
रॉबने सांगितले की, साराला दुसरा जोडीदार सापडला होता. हेच कारण आहे की तिला ना रॉबला भेटायचं होतं, ना त्याच्या कॉल्स आणि मेसेजला उत्तर देण्यात तिला रस होता. रॉबने सांगितले की सारा त्यांची भेट होण्यापूर्वीच त्याच्यापासून दूर गेली होती. हे समजल्यानंतर रॉबचं हृदय तुटलं आणि त्याला खूप वेदना झाल्या. या घटनेनंतर रॉबने डेटिंग ऍपपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.