Big News : चंद्रावर emergency situation! रशियाचे Luna-25 तांत्रिक अडचणीत; चांद्रयान 3 आधी लँडिगचा प्रयत्न फसणार?

रशियाचे  Luna-25 हे 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. त्याआधी देण्यात आलेल्या अंतिम डी-बूस्ट कमांडप्रमाणे या यानाने काम केलेले नाही. यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 19, 2023, 11:31 PM IST
Big News : चंद्रावर emergency situation! रशियाचे Luna-25  तांत्रिक अडचणीत; चांद्रयान 3 आधी लँडिगचा प्रयत्न फसणार?   title=

Chandrayaan 3 vs Luna 25:  भारताची  चांद्रयान 3 मोहिम यश्वी टप्प्यात आली आहे. दुसरीकडे रशियाचे  Luna-25 हे यान देखील चंद्राच्या कक्षेत पोहचले आहे. रशियाचे  Luna-25 या यानाचा चांद्रयान 3 आधी चंद्रावर लँडिग करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, चांद्रयान 3 आधी लँडिगचा प्रयत्न फेल होण्याची शक्यता आहे. कारण, चंद्रावर emergency situation आली आहे. रशियाचे लुना 25 यान तांत्रिक अडचणीत सापडले आहे. या मोहिमेवर काम करणारे रशियाचे वैज्ञानिक ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

रशियाच्या मून मिशनमध्ये नेमकी काय अडचण आलेय?

रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने याबाबतचे वृत्त दिले आहे. रशियाची मून मोहिम देखील अंतिम टप्प्यात आली आहे.   रशियाचे  Luna-25 हे 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. त्याआधी आज (19 ऑगस्ट) दुपारी 14:10 वाजता रशियाच्या  Luna-25  लँडरला प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये ढकलण्यासाठी अंतिम डी-बूस्ट करण्यात आले. मात्र, डी-बूस्टची कमांड या लँडरला मिळाली नाही. रशियाच्या यानाचे डी-बूस्ट होवू शकले नाही. 

भारताचे चांद्रयान 3 रशियाआधी नियोजीत वेळेनुसार चंद्रावर यशस्वी लँडिंग करेल

Luna-25 कमांड नुसार काम करत नसल्याने या मोहिवर काम करणारी वैज्ञानिकांची टीम टेन्शनमध्ये आली आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र,  Luna-25 कडून तसा प्रतिसाद मिळत नाही. ही तांत्रिक अडचण दूर न झाल्यास  Luna-25 लँडरला 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणे अशक्य आहे. असे झाल्यास भारताचे चांद्रयान 3 रशियाआधी नियोजीत वेळेनुसार चंद्रावर यशस्वी लँडिंग करेल. 

दहा दिवसात रशियाचे यान चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न 

रशियानं 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच चंद्रावर यान पाठवले आहे. रशियाचे Luna-25 हे यान भारतीय वेळेनुसार 11 ऑगस्ट मध्यरात्री 3.30 वाजता अवकाशात झेपावले. रशियाची राजधानी मॉस्कोपासून पूर्वेला 5550 किमी अंतरावर असलेल्या व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथील अंतराळ केंद्रातून  रशिया सोयुझ-2 सर्वात उंच आणि अत्यंत पावरफुल रॉकेटच्या मदतीने  हे यान प्रक्षेपित करण्यात आले.  भारताचे चांद्रयान 3 चंद्रावर लँडिग करण्याआधीच लुना 25 पोहचेल असा दावा केला जातोय.  हे यानही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. 

23  ऑगस्टला भारत  इतिहास रचणार

चांद्रयान चंद्राच्या अतिशय जवळ पोहोचलंय. प्रोपल्शन मॉड्यूल वेगळं झाल्यानंतर  चंद्रयान-3च्या विक्रम लँडरनं चंद्राच्या खालच्या बाजूच्या कक्षेमध्ये प्रवेश केला. आता त्याचं ऑर्बिट 113 किमी x 157 किमीपर्यंत कमी करण्यात आलंय. 20 ऑगस्टला विक्रम लँडर चंद्राच्या आणखी जवळ पोहोचेल. त्यावेळी चंद्रापासून फक्त ३० किलोमीटर दूर चांद्रयान असेल. 23  ऑगस्टला संध्याकाळी विक्रम लँडरचं चंद्रावर लँडिंग होणार आहे. त्या क्षणी इतिहास रचला जाणार आहे.