Animal Facts : नातेसंबंध, भावनिक गुंतागुंत जिथंजिथं येते तिथंतिथं अनेकदा नात्यांमध्ये होणारे मतभेद, वादविवादही येतातच. हल्ली याच नात्यांमध्ये एकमेकांमध्ये असणारे हेच वाद, मतभेद ही नवी बाब राहिलेली नाही. अगदी वाद विकोपास जाऊन नात्यांमध्ये येणारा दुरावासुद्धा नवा नाही. पण, आश्चर्याची बाब म्हणजे मनुष्याप्रमाणं प्राण्यांमध्येही नात्यांमध्ये दुरावा येतो. माहितीये का तुम्हाला?
जवळपास दशकाभरापासून सुरु असणाऱ्या एका निरीक्षणातून ही बाब सिद्ध झाली आहे की, मनुष्याप्रमाणंच पेंग्विन हा बर्फाळ प्रदेशातील प्राणीसुद्धा जोडीदारासमवेत शारीरिक संबंध ठेवतात, थोडक्यात प्रजनन प्रक्रिया या प्राण्यांमध्येही आढळते आणि तेसुद्धा जोडीदारासोबतचं नातं अधिक दृढ करण्यासाठीचा दुवा शोधत असतात.
संशोधक आणि अभ्यासकांच्या मते 13 प्रजनन काळांमध्ये अर्थात ब्रिडींग पिरिडमध्ये करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार पेंग्विनच्या 37000 वस्त्यांमध्ये जोडीदाराला सोडण्याचं प्रमाण अधिक दिसून आलं. सहसा निराशाजनक प्रजनन काळानंतर पेंग्विनमध्ये हा बदल दिसून येतो. अहवालानुसार पेंग्विनमधील जोडीदाराला सोडण्याच्या या वर्तणुकीतून त्यांच्या गटाची प्रजनननातील यशस्वी कामगिरी प्रभावित होते. ज्यामुळं वाईट प्रजनन काळानंतर पेंग्विन नव्या जोडीदाराचा शोध घेतात जेणेकरुन भविष्यात प्रजनन प्रक्रियेमध्ये त्यांना अडचणी येणार नाहीत.
सदर निरीक्षणामध्ये समाविष़्ट करण्यात आलेल्या 1000 पेंग्विन जोड्यांपैकी 250 जोड्या विभक्त झाल्या होत्या. तर, काही महिला पेंग्विनच्या जोडीदाराचा मृत्यू झाला होता. निरीक्षणानुसार ज्या पेंग्विनचं आपल्या जोडीसोबतचं नातं अधिक काळासाठी टीकतं त्यांची प्रजनन क्षमता काळानुरूप वाढत जाते.
बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या पेंग्विनचे आजवर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही निरीक्षणपर अहवालांनुसार या प्राण्यांच्या प्रजातीला धोकाही असल्याचं म्हटलं जात असतानाच समोर आलेला वरील अहवाल या प्रजातीसंदर्भातील सखोल माहिती देऊन जात आहे.