पेइचिंग : जन्माला आल्यापासून बाळासोबत असते ती त्याची आई. त्यामुळे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला युगानुयुगे गौरविले गेले आहे. पण या नात्याला काळीमा फसणारी धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पोटच्या मुलाला न्हाऊ-खाऊ घालून मोठ करण्याऐवजी त्याला प्लास्टिक पिशवीत पॅक करुन अनाथआश्रमात पाठविण्याचा दुर्देवी प्रकार त्या आईच्या हातून घडला आहे.
चीनच्या फुजान प्रांतातली एक महिलेच्यापोटी बाळाचा जन्म झाला. पण ते बाळ तिला नको होते. म्हणून तिने त्या बाळाला अनाथआश्रमात पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने तयारी करायला सुरुवात केली. योजनेनुसार एका प्लास्टिकच्या पिशवीत त्या बाळाला भरण्यापर्यंत तिची मजल गेली. हे सर्व करत असताना तिचे मन हेलावले नाही हे सर्वात मोठ दुर्देव. एखाद्या पार्सलप्रमाणे ती या बाळाला कुरिअर करायला निघाली. तिने कुरिअर बॉयकडे हे बाळ असलेल पार्सल सुपुर्द केलं. त्यावेळीच त्या कुरिअर बॉयला कुणकुण जाणवू लागली होती. हे पार्स एकदा तपासून पाहायचे आहे असे त्याने सांगितले पण तिने तात्काळ त्याला फटकारले. त्या यासंबधी विचारणा केली असता प्रत्येकवेळी त्याला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पॅकेट घेऊन तो अनाथाश्रमात जात असताना रस्त्यात त्याला पॅकेटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने ते उघडून पाहिलं तर आत नवजात मुलगी होती. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय या घटनेत आला. कुरिअर बॉयने प्रसंगावधान दाखवत तत्काळ पोलिसांना यासंबधी माहिती दिल्याने मुलीचे प्राण वाचले.
पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्याने मुलीवर लगेच उपचार करणे सोपे झाले. मुलीची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या बातमीनंतर सगळीकडे त्या आईविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.