राष्ट्रगीताचा अवमान केला तर खबरदार!

खबरदार, यापुढे राष्ट्रगीताचा अवमान केला तर अशा व्यक्तींना १५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. चीनी संसदेनं हा कडक कायदा संमत केलाय. येत्या १ ऑक्टोबरपासून हा कायदा देशभर लागू होणार आहे.

Updated: Sep 2, 2017, 05:50 PM IST
राष्ट्रगीताचा अवमान केला तर खबरदार! title=

बीजिंग : खबरदार, यापुढे राष्ट्रगीताचा अवमान केला तर अशा व्यक्तींना १५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. चीनी संसदेनं हा कडक कायदा संमत केलाय. येत्या १ ऑक्टोबरपासून हा कायदा देशभर लागू होणार आहे.

न्यूज एजन्सी शिन्हुआनं दिलेल्या माहितीनुसार, चीनचं राष्ट्रगीत 'मार्च ऑफ द वॉल्युंटर्स' काही ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी वापरण्यात परवानगी देण्यात आलीय. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या सत्रांच्या प्रारंभाला आणि समाप्तीच्या वेळी तसंच औपचारिक राजनितीक सभांना आणि इतर अशाच काही मोठ्या अधिकृत कार्यक्रमांनाच राष्ट्रगीत वापरता येणार आहे. 

विनाकारण खाजगी कार्यक्रमांत, जाहिरातींत किंवा सार्वजनिक ठिकाणी पार्श्वसंगीताच्या रुपात राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगीताचं म्युझिक, ट्युनचा वापर करण्यास यापुढे बंदी असेल. मात्र हे राष्ट्रगीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील पुस्तकांत दिसणार आहे. डिसेंबर १९८२ मध्ये 'मार्च ऑफ द वॉल्युंटर्स'ला राष्ट्रगीताच्या रुपात मंजुरी मिळाली होती.