वॉशिंग्टन : संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या विळख्यात सापडले आहे. coronavirus vaccine ची प्रतीक्षा असताना अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि रशिया यांच्यात वाद-विवाद होत आहे. अमेरिका, यूके आणि कॅनडा (United States,UK and Canada) यांनी आरोप केला आहे की रशियाने (russia) त्यांच्या कोव्हीड -१९ लस (COVID-19 vaccine) संशोधनाची माहितीची चोरी केली आहे.
तिन्ही देशांच्या सरकारने असा दावा आहे की, रशियन समर्थक हॅकर्स कोरोना लस बाबतच्या संशोधनात गुंतलेल्या वैद्यकीय संस्था आणि विद्यापीठांवर सायबर हल्ले करून संशोधन चोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तिन्ही देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, APT29 (Cozy Bear) नावाच्या हॅकिंग गटाने त्यांच्या संशोधनाशी संबंधित माहिती चोरण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मात्र रशियाने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. हे आरोप रशियाकडून फेटाळण्यात आले आहे. रशियाने पहिली कोरोना लसची चाचणी घेतली आहे.
अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा असा आरोप करतात की कोझी बिअर रशियाच्या गुप्तचर संस्था आणि सरकारच्या इशाऱ्यावर कारवाई करतात. ब्रिटनच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरचे (एनसीएससी) संचालक पॉल चेचेस्टर म्हणाले की, "कोरोना साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी करणाऱ्यांविरूद्ध अशा सायबर हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. सायबर सुरक्षा संशोधकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी अमेरिका, जपान, चीन आणि आफ्रिकेतील ग्राहकांच्या विरोधातही APT29 हॅकिंग साधन वापरले गेले होते.
ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी म्हटले आहे की, रशियाच्या गुप्तचर संस्था कोरोना साथीच्या लढा देणाऱ्या संस्थांवर हल्ले करणे दुर्दैवी असून ते स्वीकारले जाणार नाहीत. विशेष म्हणजे मे आणि ब्रिटनने अमेरिकेने म्हटले होते की, हॅकर्सच्या नेटवर्कने कोरोनाला सोडविण्याच्या प्रयत्नात असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना लक्ष्य केले, परंतु रशियाचा यात सहभाग असल्याचे म्हटले जात नाही. आता अमेरिका, ब्रिटन तसेच कॅनडा असेही म्हणते की रशिया हॅकर्सच्या माध्यमातून लस कार्यक्रमाविषयी महत्वाची माहिती चोरत आहे.
दरम्यान, गुप्तचर संस्थांचे अधिकारी सातत्याने या चोरीच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत माहिती चोरीला गेली का, हे स्पष्ट झाले नाही. मात्र, राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राच्या दाव्यानुसार, आतापर्यंत कोणतीही गुप्त माहिती चोरीला गेलेली नाही. अमेरिकेने याआधी कोझी बीअर हॅकिंग गटाबाबत माहिती मिळवली होती. हा गट रशियन सरकारशी निगडीत असलेल्या गटांपैकी एक आहे. या गटाने २०१६मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी काही इमेल चोरले असल्याचे समोर आले होते.
याआधीदेखील अमेरिका, जर्मनीने चीनवर अशाप्रकारचे आरोप लावले होते. चीन आम्ही विकसित करत असलेल्या लससंदर्भात माहिती चोरत असल्याचा आरोप अमेरिका, जर्मनीने केला होता. चीन सरकारशी संबंधित हॅकर्सकडून हे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता.