Kissing Day: जोडीदाराच्या प्रत्येक चुंबनाचा आहे वेगळा अर्थ, जाणून घ्या

चुंबन हे प्रेम आणि भावना पोहोचवण्याचं माध्यम आहे. चुंबन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Updated: Jul 6, 2022, 08:15 PM IST
Kissing Day: जोडीदाराच्या प्रत्येक चुंबनाचा आहे वेगळा अर्थ, जाणून घ्या  title=

Kiss Day 2022: दरवर्षी 6 जुलै रोजी चुंबन दिवस साजरा केला जातो. चुंबन हे प्रेम आणि भावना पोहोचवण्याचं माध्यम आहे. चुंबन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चुंबन केल्याने मेंदूमध्ये एक केमिकल रिअॅक्शन तयार होते. यामुळे प्रेम आणि आसक्ती वाढते. चुंबन घेताना चेहऱ्याचे 34 स्नायू आणि शरीराचे 112 पोश्चर स्नायू सक्रिय होतात. चुंबनामुळे तणाव देखील कमी होतो. कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होऊ शकते. जोडीदाराच्या प्रत्येक चुंबनाचा वेगळा अर्थ असतो. आज आंतरराष्ट्रीय चुंबन दिनानिमित्त आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी किस करणं म्हणजे काय हे सांगणार आहोत.

चुंबनचा अर्थ जाणून घ्या

कपाळावरील चुंबन: पालक, जवळचे मित्र आणि जोडीदार नात्यानुसार एकमेकांचं चुंबन घेतात. चुंबन नेहमीच प्रेम आणि बंधनाचे प्रतीक आहे. चुंबनामुळे नात्यात ओलावा निर्माण होतो. जोडीदाराने कपाळावर चुंबन घेतले तर त्याला तुमच्या काळजी असते. कपाळावर किस केयर सिम्बॉल असते. यामुळे जोडीदार तुमचा मनापासून आदर करतो आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करतो, असं दिसतं.

गालावर चुंबन: जर कोणी गालावर चुंबन घेत असेल तर याचा अर्थ प्रेमसंबंध असा होत नाही. प्राधान्य व्यक्त करण्याचा हा एक मार्ग असू शकतो. गालावर चुंबन घेणे हे प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.  यातून नातं व्यक्त होतं. 

मानेवर चुंबन: मानेवरील चुंबन आकर्षण निर्माण करतं. हे चुंबन खासकरून रोमँटिक पार्टनर्समध्ये होते. मानेवरील चुंबन शारीरिक आकर्षण देखील दर्शवते. जर एखाद्याने तुमच्या मानेवर चुंबन घेतले तर त्याचा अर्थ असा होतो की तो तुमच्याकडे शारीरिक आणि लैंगिकदृष्ट्या आकर्षित झाला आहे.

ओठांचे चुंबन: ओठ हे खोल प्रेमाचे प्रतीक आहे. जर तुमचा पार्टनर तुम्हाला ओठांवर किस करत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तो तुमच्यावर प्रेम करतो.