Architecture: आपल्याला कायम वाटत असतं आपलं घर प्रशस्त असलं पाहीजे. तीन चार खोल्यांसह घरात डायनिंग टेबल, फर्निचर असायला हवं. मात्र प्रत्येकाच्या नशिबात असं घर असतंच असं नाही. बहुतेक जणांना वन रुम किचन असलेल्या घरातच आपलं आयुष्य घालवावं लागतं. कारण मोठं घर घेणं परवडणारं नसतं. त्यामुळे आहे त्या घरात बदल करुन समाधान मानावं लागतं. पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही समाधानी व्हाल. व्हिडीओमध्ये वास्तुकलेचा उत्तम नमुना दाखवण्यात आला आहे. अशा नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे तुमचे घर अधिक व्यवस्थित होण्यास मदत होऊ शकते.
तुमचे घर अधिक व्यवस्थित बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये काही युक्त्या दाखवल्या आहेत. एक वस्तू अनेक प्रकारे कशी काम करते, हे या व्हिडीओमध्ये दाखवलं आहे. साधं टेबलचं रुपांतर देखील शिडीसारखे कार्य करू शकते. सगळ्यात आधी तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ पाहा...
Wowww very nice designs pic.twitter.com/jTONo88EHC
— Tansu YEĞEN (@TansuYegen) July 5, 2022
कल्पना वापरता येतील
एक व्यक्ती बसण्याच्या टेबलातून पाच स्टूल काढते आणि जेवणाचे टेबल सेट करते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एक सोफा बेडमध्ये बदलला जातो. त्याचप्रमाणे, ड्रॉवर टेबल काही सेकंदात बेडमध्ये आणि नंतर स्टडी टेबलमध्ये बदलते. एक वस्तूचं रुपांतर तीन वस्तूंमध्ये करू शकतो. या सर्व युक्त्या तुम्ही तुमच्या घरातही वापरू शकता. बेडचा अनेक वेळा वापर कसा करता येतो हे देखील पुढे दाखवले आहे.
आतापर्यंत 2.5 दशलक्षाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अवघ्या 31 सेकंदात अनेक युक्त्या दाखवल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एवढेच नाही तर एक लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइकही केले आहे.