सूर्यावर स्फोटांची मालिका, पृथ्वीवर चक्रीवादळ आणि ब्लॅक आऊटची भीती

 वाढलेल्या स्फोटांमुळे त्याची झळ पृथ्वीला बसते आहे. 

Updated: Apr 17, 2022, 06:57 PM IST
सूर्यावर स्फोटांची मालिका, पृथ्वीवर चक्रीवादळ आणि ब्लॅक आऊटची भीती title=

विशाल करोळे, औरंगाबाद : अंतराळात जे काही घडतं त्याचे परिणाम पृथ्वीवर होतात. सध्या सूर्यावर स्फोटांची मालिका सुरु आहे. या स्फोटांमुळे ज्या ज्वाळा तयार होत आहेत. त्याची धग चक्क पृथ्वीपर्यंत पोहोचते आहे.

गेल्या काही वर्षात सूर्यावर स्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. वाढलेल्या स्फोटांमुळे सूर्याच्या अग्नीज्वाळा सूर्याच्या बाह्य आवरणात फेकेल्या जात आहेत. या ज्वाळा थेट पृथ्वी पर्यंत येत नाहीत. मात्र त्याची झळ पृथ्वीला बसते आहे. याशिवाय सूर्याभोवती शक्तीशाली सौर वादळंही सुरू आहेत. यासगळ्याचा परिणाम पृथ्वीवर होतोय. त्यामुळे येत्या काळात पृथ्वीवर मोठ मोठी चक्रीवादळं येऊ शकतात अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

का होताय सूर्यावर स्फोट? 

सूर्यावर दर 11 वर्षांनी कमाल आणि किमान स्फोट अशी सायकल असते. किमान स्फोटांची सायकल 2019 ला संपली आता कमाल सायकल सुरू झाली आहे. त्यामुळे स्फोटांचं प्रमाण वाढलंय. 
2030 पर्यंत याची तीव्रता कमी जास्त प्रमाणात असेल. मात्र 2024 मध्ये याची झळ सर्वात जास्त असेल. गेल्या वर्षी फेब्रुवारीत सूर्यावर 50 स्फोट झाले. त्याचे थेट परिणाम वातावरणातील उपग्रहांवर तसंच पृथ्वीच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर होऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हंटलं आहे. 

सूर्याचं सध्या विषुववृत्तीय भागातून म्हणजेच भारत असलेल्या रेषेतून मार्गक्रमण सुरु आहे. त्यामुळे चक्रीवादळांचा धोका वाढला आहे. शिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणंही खराब होऊ शकतात. इतकंच नाही तर पृथ्वीवर ब्लॅक आऊट होण्याची भीतीही व्यक्त होते आहे. या नव्या संकटानं जगाच्या चिंतेत पुन्हा एकदा भर घातली आहे.