धक्कादायक! कोरोनानंतर आणखी एक व्हायरस?

आता बातमी चिंता वाढवणारी. राज्यात कोरोनाचं टेन्शन वाढलं असताना एक नवा व्हायरस डोकं वर काढतोय.

Updated: Jun 17, 2022, 11:52 PM IST
धक्कादायक! कोरोनानंतर आणखी एक व्हायरस? title=

उत्तर कोरिया : आता बातमी चिंता वाढवणारी. राज्यात कोरोनाचं टेन्शन वाढलं असताना एक नवा व्हायरस डोकं वर काढतोय. उत्तर कोरियात आतड्यांवर हल्ला करणा-या व्हायरसनं थैमान घातलं असून त्यामुळे जगाचं टेन्शन पुन्हा वाढलंय. (fact check new epidemic identified after corona in north korea this disease attacks the intestines of the body)

आधीच कोरोनाच्या साथीमुळे जग मेटाकुटीला आलं असताना आता अधिक घातक व्हायरस सापडलाय. उत्तर कोरियाच्या दक्षिण किना-यावरील हेजू या शहरात एक नवाच आजार बळावलाय. अनेक लोकांना एका अज्ञात व्हायरसची बाधा झाली असून तो थेट माणसाच्या आतड्यांवर हल्ला करत असल्याचा संशय आहे. 

उत्तर कोरियातील सरकारी वृत्तसंस्था कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनं या नव्या आजाराबाबत माहिती दिलीये. हा आजार एंटरिक म्हणजे आतड्यांशी संबंधित असल्याचा दावा केला गेलाय.  टायफॉईड किंवा कॉलरापेक्षाही हा रोग अधिक गंभीर असल्याची भीती व्यक्त करण्यात आलीये. 

दुषित अन्न, पाणी यामुळे साथ पसरत असल्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या विषाणूमुळे हा आजार होतोय, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. 

या नव्या व्हायरसमुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन पुरता हादरलाय. त्यानं हा आजार लवकरात लवकर थांबवण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणांना दिलेत. आधीच कोरोनामुळे उत्तर कोरियाचं कंबरडं मोडलंय. चीन वगळता अन्य कोणत्याच देशासोबत संबंध नसल्यामुळे तिथं नेमकं काय होतं ते बाहेरही येत नाही. 

हा नवा व्हायरस नेमका किती घातक आहे, त्याचा फैलाव किती झालाय याची काहीच माहिती दिली गेलेली नाही. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करणा-या जगाचं टेन्शन आणखी वाढलंय.