Father's Day Special : वडिलांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे फादर्स डे (Fathers Day 2023). जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी 18 जूनला जगभरात फादर्स डे साजरा करण्यात येणार आहे. वरुन कितीही कठोर दिसणारा हा माणूस आतून फार हळवा असतो. लेकरांसाठी त्याचा जीव आई एवढ्याच व्याकूळ होतो. बापलेकीचं किंवा बापलेकाचं नातही ही जगात सर्वात सुंदर नातं असतं. फादर्स डे निमित्त अशा एका बापाची कहाणी सांगणार आहोत. जो लेकीना न्याय मिळवून देण्यासाठी 35 वर्षे लढला पण त्याची ही लढाई अपूर्ण राहिली.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार ही कहाणी आहे, 28 वर्षीय जुलीच्या कुटुंबाची. जुली ही एक वन्यजीव छायाचित्रकार होती. उंच भरारी घेण्यासाठी ती घरापासून दूर होती. आई वडील मुलीचं यश पाहून आनंद होते. पण त्या एका घटनेने त्यांचा आयुष्याच संपूर्ण हादरलं. ब्रिटनमध्ये कुटुंबासोबत राहणारी जुली करिअरसाठी आफ्रिकन देशातील केनियामध्ये गेली. तिथे तिच्यासोबत भयानक घटना घडली.
एकेदिवशी कुटुंबाला तिच्या मरण्याची बातमी मिळाली. कोणी त्यांना सांगितलं की तिला प्राण्यांनी खाल्लं. तर कधी तिच्यावर वीज पडून तिच्या मृत्यू झाल्याचं सांगितलं. केनियातील मसाई मारा या ठिकाणी 1988 मध्ये जुलीची हत्या झाली. लेकीचा मारेकरी शोधण्यासाठी तिच्या वडिलांनी जॉनने आकाश पाताळ एक केलं. 100 हून अधिक वेळा केनियात जाऊन त्यांनी पुरावे जमा केले. अगदी सरकारशी पण लढण्याची वेळ त्यांच्यावर आली.
#JulieWard Her parents who devoted their lives and resources to get justice for her have died within two weeks of each other. But their sons will carry on the quest. They still point a finger at Jonathan Moi. pic.twitter.com/nTrqzGwXQQ
— Gabriel Dolan (@GabrielDolan1) June 13, 2023
या हत्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी यूके सरकार केनिया सरकारला मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांचा मुलीवर बलात्कार करण्यात आला होता त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. लेकी न्याय मिळवण्यासाठी या वडिलांनी गेले 35 वर्षे संघर्ष करत आहेत. पण इतक्या वर्षांपासून सुरु असलेली ही लढाई अधुरी राहिली. (Fathers Day Special john ward father daughter julie Sexual assault murder father justice 35 year fight end)
वडील जॉन वॉर्ड यांचं निधन झालं. लेकीच्या मारेकऱ्याला शिक्षा न देताच ते जग सोडून गेले. धक्कादायक म्हणजे त्यांचा लढाई साथ देणारी त्यांची पत्नीनेही त्यांचा जाण्याच्या दोन आठवड्यापूर्वीच जग सोडलं. जॉनचा मुलगा बॉब याने वडिलांच्या निधनाची बातमी दिली. आई वडिलांची ही लढाई बॉब आणि त्याचा भाऊ पुढे नेणार असल्याचा त्याने सांगितलं आहे. बहिणीच्या निधनानंतर वडिलांचं सतत एकच ध्यास होता मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे.
वडिलांनी सत्य जाणून घेण्यासाठी ब्रिटनमधून केनिया, अमेरिका, डेन्मार्क, बेल्जियम, फ्रान्स, युगांडा आणि टांझानिया असा प्रवास केला. केनियाच्या कोर्टात ते सुनावणीला हजर राहायचे. फॉरेन्सिक सायन्सलाही त्यांनी पुरावे जमा करण्यासाठी मदत केली. पण त्यांना कायम अपयश येतं होतं. ज्युलीला ज्या ठिकाणी शेवटचं पाहिलं. त्यांनी त्या जागेचा स्वत: शोध घेतला. त्या भागाची तपासणी करण्यासाठी पाच विमानं घेतली. त्यांच्या या शोध मोहीमेला यश आलं.
Family of murdered British tourist Julie Ward, 28, vow to continue her father's fight to pin murder https://t.co/VsALDefUtp pic.twitter.com/ZhkeeG61xP
— ZULEYDI P (@zuleydi_perez) June 13, 2023
ज्युलीची गाडी आणि त्यापासून 10 मैल दूर तिचा मृतदेह सापडला. खरं तर अतिशय धक्कादायक होतं मुलीचा फक्त जबडा आणि पाय मिळाले होते. कारण तिचं शरीर कोणीतरी जाळलं होतं. वडिलांनी गोळा केलेल्या पुराव्यांनंतर असं समोर आलं होतं की, तत्कालीन राष्ट्राध्यक्षांचा मुलगा जोनाथन मोई यांनी त्यांचा मुलीवर बलात्कार केला होता. त्यामुळे हे प्रकरण दडवलं जातं होतं.
अनेक लढाई आणि धावपळीनंतर 2010 मद्ये ज्युलीच्या प्रकरणात नवीन तपास सुरु झाला. लंडनचे गुप्तगेरही स्थानिक पोलिसांसोबत या प्रकरणाची तपासणी करत होते. डीएनए चाचणीची मदत घेण्यात आली. दरम्यान वडिलांच्या निधनानंतर ही लढाई आता ज्युलीच्या भाऊ लढणार आहे.