मुंबई : फीफा वर्ल्डकपचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. फ्रांस, बेल्जियम, क्रोएशिया आणि इंग्लंड या चार टीमने सेमी फायनल्समध्ये प्रवेश मिळवला आहे. अनेक दिग्गज खेळांडूंनी त्यांचं कौशल्य पणाला लावून खेळ रंगवला. रशियामध्ये यंदा रंगणार्या वर्ल्डकप सामन्यांसोबतच अनेक घडामोडींनी यंदाचा फीफा वर्ल्डकप चर्चेमध्ये आला आहे. त्यापैकी एक म्हणजे महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान मुलाने किस केले. त्यानंतर सेक्शुअल हरेस्ट (लैंगिक शोषणाचा) मुद्दा रंगला होता. मात्र आता एका कोरियन पत्रकाराला दोन रशियन मुलींनी किस केल्याचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Jeon Gwang-ryeol नावाचा कोरियन पत्रकार रशियामध्ये फीफा वर्ल्डकपचं रिपोर्टींग करत होता. हा पत्रकार साऊथ कोरियन टीव्ही चॅनल MBN साठी काम करत होता.
लाईव्ह अॅंकरिंग़ करताना दोन रशियन मुलींनी त्याच्या गालावर किस केलं. त्या पत्रकाराने हसत हसत हा प्रकार स्वीकारत त्याचं कव्हरेज पूर्ण केलं. हा व्हिडिओ 28 जूनला प्रसारित झाला आहे.
A DW reporter was sexually harassed while covering the #WorldCup. @JULIETHCGT was kissed, groped by a man while reporting from Moscow.
The incident can be seen here (00:13).
Sexual harassment is not okay. It needs to stop. In football, and elsewhere.pic.twitter.com/O0S1a1F4Es
— DW Sports (@dw_sports) June 20, 2018
महिलांसोबत लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान अशा विचित्र प्रकारानंतर त्यांनी संबंधित व्यक्तींना सडेतोड उत्तर दिले होते. महिला रिपोर्ट्सना अशाप्रकारे किस केल्यानंतर त्यावर जगभरातून प्रतिक्रिया आल्या होत्या.